मुंबई :माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टामध्ये सुनावणी होणार (Anil Deshmukh Bail Hearing Today) आहे. अनिल देशमुख यांच्या वतीने वरिष्ठ वकील विक्रम चौधरी आणि वकील इंद्रपाल सिंग युक्तिवाद करणार (money laundering case) आहे. माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी मुंबईतील बार रेस्टॉरंट मालकांकडून वसुली करण्याचे निर्देश दिले असल्याचा आरोप लावल्यानंतर सीबीआयच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आला होता. अनिल देशमुख या प्रकरणात सध्या न्यायालयीन कोठडीत आहे.
जामीन मंजूर :सीबीआयच्या गुन्ह्यावरुन ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात उच्च न्यायालयाने देशमुखांना जामीन मंजूर केला आहे. तसेच याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलेल्या ईडीला कोणताही दिलासा न देता सर्वोच्च न्यायालयानं त्यांचे अपील फेटाळून लावले आहे. त्यामुळे देशमुखांनी सीबीआयच्या प्रकरणातही जामीन मागत कोर्टात याचिका दाखल केली आहे. यावरील सुणावणीला आजपासून सुरुवात होणार (bail application Hearing in CBI court) आहे.
सुनावणी सुरु :दरम्यान आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (former Home Minister Anil Deshmukh) यांच्या न्यायालयीन कोठडीत 1 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्याचा निर्णय मुंबई सत्र न्यायालयाने दिला होता. या प्रकरणात अनिल देशमुख यांच्यासह कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या आरोपींच्याही न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सुनावणी न्यायालयात सुरु (Anil Deshmukh bail application) आहे.