महाराष्ट्र

maharashtra

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरण : नरेश गोर, विनायक शिंदेची 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी वाढवली

By

Published : Mar 30, 2021, 4:54 PM IST

Updated : Mar 30, 2021, 5:43 PM IST

मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींची 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी वाढवली आहे.

Mansukh Hiren death case
संग्रहित छायाचित्र

मुंबई -मुकेश अंबानी यांच्या घराजवळ जिलेटिनच्या कांड्यांनी भरलेली गाडी आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात विशेष एनआयए कोर्टाने नरेश गोर आणि विनायक शिंदे या दोन आरोपींची 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी वाढवली आहे. दोन्ही आरोपी मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सहआरोपी आहेत.

सचिन वाझेवर युएपीए -

यापूर्वी आरोपी सचिन वाझेवर युएपीए (UAPA) कायद्यातील कलम लावण्यात आली आहेत. मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास आधी महाराष्ट्र एटीएस करत होती. पण, ठाणे न्यायालयाच्या आदेशानंतर हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे एटीएसने अटक केलेल्या विनायक शिंदे आणि नरेश गोर याचा ताबाही एनआयएला मिळाला आहे. त्यानंतर आता या दोघांवरही युएपीए कायद्यातील कलमं लावली आहेत.

हेही वाचा -व्यापाऱ्याने मास्क वापरला नाही म्हणून नाशिक महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चक्क फर्निचरच नेले उचलून

आज मुंबई येथील विशेष एनआयए कोर्टाने या दोघांचीही 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी वाढवली आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या जिलेटिनच्या कांड्या आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे याच्या विरोधातही एनआयएने युएपीएअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. वाझेला ताब्यात घेतल्यानंतर एनआयएने मोठी कारवाई केली होती.

काय आहे युएपीए कायदा?

लोकसभेत जुलै 2019 मध्ये या कायद्यातील तरतुदींना मंजुरी मिळाली. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला तपासाच्या आधारावर दहशतवादी जाहीर करण्याचा अधिकार सरकारला आहे. यापूर्वी फक्त संघटनेला दहशतवादी जाहीर करण्याची तरतूद या कायद्यात होती. जर एखादी व्यक्ती दहशतवादी कृत्यांना प्रोत्साहन देत असेल, त्यामध्ये सहभागी असेल, तर त्याला दहशतवादी ठरवलं जाईल. यापूर्वी केवळ संघटनांवर दहशतवाद्याच्या कायद्याप्रमाणे संघटनांना दहशतवादी घोषित करत दहशतवादी म्हणून शिक्का मारला जात होता. आता संशयित व्यक्तीवर दहशतवादाचे आरोप सिद्ध झाल्यावर दहशतवादी म्हणून शिक्षा केली जाईल.

हेही वाचा -तलवारी घेऊन हजारो शीख पोलिसांवर धावले, बघा नांदेडचा थरारक VIDEO

Last Updated : Mar 30, 2021, 5:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details