महाराष्ट्र

maharashtra

ED summons Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज हजर राहण्याकरिता ईडीकडून समन्स

By

Published : Jul 19, 2022, 9:49 PM IST

Updated : Jul 20, 2022, 7:27 AM IST

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशीकरिता बुधवारी (20 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.

Sanjay Raut
संजय राऊत

मुंबई - शिवसेना खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. पत्रा चाळ प्रकरणात संजय राऊत यांना पुन्हा ईडीकडून समन्स पाठवण्यात आले आहे. यापूर्वी देखील संजय राऊत यांची आठ तास चौकशी करण्यात आली होती. संजय राऊत यांना आज ( 20 जुलै ) चौकशीला हजर राहण्याचे निर्देश ईडीने समन्समधून देण्यात आले आहे.

शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांना पुन्हा ईडीने चौकशीकरिता बुधवारी (20 जुलै) मुंबईतील ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावलं आहे. गोरेगाव येथील पत्राचाळ कथित घोटाळ्याप्रकरणी समन्स बजावले आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 10 तास संजय राऊत यांची चौकशी करण्यात आली होती.

संजय राऊतांचे निकटवर्तीयांची चौकशी - संजय राऊत यांना ईडीच्या मुंबई कार्यालयाकडून मंगळवारी समन्स बजावण्यात आले आहे. बुधवारी 20 जुलै रोजी त्यांना चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना हे समन्स बजावण्यात आले आहे. यापूर्वी दोन वेळा राऊतांची चौकशी झाली आहे. याच प्रकरणी ईडीने आज संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर आणि स्वप्ना पाटकर यांची सुमारे सहा तास चौकशी करण्यात आली, त्यानंतर त्यांना सोडण्यात आले. पण आता राऊतांना नोटीस बजावली असून उद्या त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा म्हाडा भूखंड आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे. पत्राचाळमध्ये राहणाऱ्या 672 भाडेकरूंना सदनिका देण्याची योजना सरकारने आखली. तेव्हा हा घोटाळा सुरू झाला. ही चाळ विकसित करण्याचे कत्रांट महाराष्ट्र गृहनिर्माण व विकास प्राधिकरणाने प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिले होते. गुरु आशिष कंपनी चाळीतील भाडेकरूंना 672 सदनिका देऊन 3 हजार फ्लॅट एमएचडीएला देणार होती. हे फ्लॅट 47 एकर जागेवर बांधले जाणार होते. मात्र गुरु आशिष कन्स्ट्रक्शनने तसे केले नाही. कंपनीने चाळीतील लोकांसाठी फ्लॅट बांधले नाहीत किंवा एमएचडीएला फ्लॅटही दिला नाही. कंपनीने ही जमीन अन्य आठ बिल्डरांना 1,034 कोटी रुपयांना विकली. हे दोन्ही घोटाळे करणाऱ्या एचडीआयएलचे संचालक प्रवीण राऊत, सारंग वाधवान, राकेश वाधवन आहेत.

ईडीने प्रवीण राऊत यांना पकडले तेव्हा संजय राऊतांचे नाव समोर आले. प्रवीण हे शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मित्र आहेत. प्रवीण यांच्या पत्नीने संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना 83 लाखांचे कर्जही दिले होते. ज्याचा वापर राऊत कुटुंबाने दादरमध्ये फ्लॅट घेण्यासाठी केला होता. तपास सुरू झाल्यावर वर्षा यांनी प्रवीण यांच्या पत्नीला 55 लाख रुपये परत केले. या प्रकरणातील आणखी एक आरोपी सुजित पाटकर यांचाही संजय राऊत यांच्याशी संबंध आहे. सुजित हे संजय राऊत यांच्या मुलीच्या फर्ममध्ये भागीदार आहेत. सुजित यांची पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नीने मिळून अलिबागमध्ये जमीन खरेदी केली होती. ही जमीनही घोटाळ्याच्या पैशातून घेण्यात आली होती, असा आरोप आहे.

Last Updated : Jul 20, 2022, 7:27 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details