महाराष्ट्र

maharashtra

Aryan Khan Drug Case : आर्यनच्या न्यायालयीन कोठडीत वाढ; ३० ऑक्टोबरपर्यंत तुरुंगातच मुक्काम

By

Published : Oct 21, 2021, 6:50 PM IST

Aryan Khan
आर्यन खान

क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने आज(21 ऑक्टोबर) हा निर्णय दिला आहे.

मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. विशेष एनडीपीएस न्यायालयाने आज(21 ऑक्टोबर) हा निर्णय दिला आहे. बुधवारी आर्यनचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर आर्यनच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, यावरची सुनावणी देखील २६ ऑक्टोबरला होणार आहे.

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या अडचणी संपताना दिसत नाहीत. आज पुन्हा एकदा NDPS न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळला. आर्यनसह इतर सात जणांच्या न्यायालयीन कोठतीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आर्यनचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे.

हेही वाचा -VIDEO : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पाडेंबरोबर एनसीबी कार्यालयात दाखल

  • 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपली -

याआधी ७ तारखेला झालेल्या सुनावणीमध्ये आर्यन खान आणि इतर आरोपींना १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला होता. ही न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत असल्यामुळे त्यावर पुन्हा सुनावणी घेण्यात आली. यावेळी आर्यन खान आणि इतर आरोपींची पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.

  • शाहरुखने घेतली आज आर्यनची तुरुंगात जाऊन भेट -

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुरुंगातील कैद्यांना कोणालाही भेटण्याची परवानगी दिली जात नव्हती. मात्र, प्रादुर्भाव कमी होत असल्याने शाहरुख खानला मुलाला भेटण्याची परवानगी मिळाली. गुरुवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शाहरुख आर्थर रोड जेलमध्ये दाखल झाला. यावेळी जवळपास दहा मिनिटं दोघांमध्ये बोलणे झाले. बापलेकात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, वडिलांच्या भेटीनंतर आर्यनच्या काय भावना होत्या, याचा तपशील मिळालेला नाही. तसेच शाहरुखनेही भेटीनंतर कुठलीही प्रतिक्रिया देणे टाळले.

हेही वाचा -आर्यन खान प्रकरणात अभिनेत्री अनन्या पांडेची एनसीबी कार्यालयात दोन तासांपासून चौकशी सुरु

ABOUT THE AUTHOR

...view details