महाराष्ट्र

maharashtra

Police Alert : राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट; गुप्तचर यंत्रणा अलर्ट

By

Published : May 3, 2022, 6:02 PM IST

मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे (Mosques Loudspeakers Controversy) हटविण्याबाबत मनसेने राज्य सरकारला उद्यापर्यंतचा (4 मे) अल्टिमेटम (MNS ultimatum to State government) दिला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Dilip Walse Patil Meet CM Uddhav Thackeray) यांची दुपारी शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली.

police file photo
महाराष्ट्र पोलीस फाईल फोटो

मुंबई -मशिदीवरील बेकायदेशीर भोंगे (Mosques Loudspeakers Controversy) हटविण्याबाबत मनसेने राज्य सरकारला उद्यापर्यंतचा (4 मे) अल्टिमेटम (MNS ultimatum to State government) दिला आहे. याबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Dilip Walse Patil Meet CM Uddhav Thackeray) यांची दुपारी शासकीय निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे आणि गृहसचिव उपस्थित होते. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी राज्य सरकार अलर्ट मोडवर आहे. तसेच गुप्तचर यंत्रणाही सतर्क झाली आहे.

कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट -मनसेने दिलेल्या उद्याच्या अल्टीमेटमबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत चर्चा झाली. राज्यात कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याबाबत गृह विभागाकडून घेण्यात आलेल्या दक्षतेबाबत या बैठकीत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा कट असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून गृह विभागाला देण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यात अशांतता पसरवण्याचे षडयंत्र -राज्यात अशांतता पसरवण्याचे षड्यंत्र काही लोक करत असून, यासाठी राज्याबाहेरील लोकांना राज्यात आणून अशांतता पसरवण्याचा कट आखला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी नाव न घेता विरोधकांवर केला आहे. खासदार संजय राऊत आज मुख्यमंत्र्यांना वर्षा निवासस्थानी भेटायला गेले होते. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हे आरोप केले आहे. तसेच राज्य सरकारला कोणताही अल्टिमेटम चालणार नाही. हे ठाकरे सरकार असून केवळ ठाकरे सरकारचा शब्द येथे पाळला जाईल, असा इशाराही मनसेला संजय राऊत यांनी यावेळी दिला.

ABOUT THE AUTHOR

...view details