महाराष्ट्र

maharashtra

भारतीय संघाचे बुद्धिबळात यश, अजित पवार म्हणाले . . . .

By

Published : Aug 31, 2020, 5:07 PM IST

बुद्धिबळ क्षेत्रात विश्वविजेता स्पर्धेनंतर मानाची समजली जाते. दिग्गजांचा सहभाग असलेल्या संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या विदिथ गुजराथीसारख्या तरुणाने करणे, त्याला दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहार सरीन यांच्या युवा टीमची साथ मिळणे यातून संयुक्त विजेतेपदाचे हे ऐतिहासिक यश मिळाले आहे.

ajit pawar
अजित पवार

मुंबई - बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये रशियाच्या सोबतीने भारताला संयुक्त विजेतेपद मिळाले आहे. भारतीय संघाने मिळवलेल्या यशाचा महाराष्ट्राला आनंद आणि अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री आणि राज्य ऑलिंपिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी विजेत्या संघाचे कौतुक केले आहे.

बुद्धिबळ क्षेत्रात विश्वविजेता स्पर्धेनंतर मानाची समजली जाते. दिग्गजांचा सहभाग असलेल्या संघाचे नेतृत्व महाराष्ट्राच्या विदिथ गुजराथीसारख्या तरुणाने करणे, त्याला दिव्या देशमुख, प्रज्ञानंद, निहार सरीन यांच्या युवा टीमची साथ मिळणे यातून संयुक्त विजेतेपदाचे हे ऐतिहासिक यश मिळाले आहे.

बुद्धीबळाच्या क्षेत्रात भारताची गौरवशाली परंपरा युवा खेळाडू तितक्याच समर्थपणे पुढे नेत आहेत. या विजेत्यापदामुळे येणाऱ्या काळात अनेक युवक बुद्धीबळाकडे प्रोत्साहित होतील असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details