महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Oxygen Demand : मुंबईत पहिल्या, दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या मागणीत घट

By

Published : Feb 7, 2022, 7:42 PM IST

मुंबईमध्ये मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. यापैकी दुसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या ११ हजारावर पोहचली होती या दरम्यान दिवसाला सर्वाधिक १६०० मॅट्रिक टन ऑक्सिजन लागले. तर तिसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या २० हजारावर पोहचली मात्र यादरम्यान सर्वात कमी ३०० ते ४०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कमी प्रमाणात ऑक्सिजन लागले तसेच रुग्णसंख्या ( demand for oxygen decreases in mumbai ) कमी झाली.

Mumbai Oxigen Demand
मुंबई महापालिका

मुंबई -मुंबईमध्ये मागील दोन वर्षापासून कोरोनाचा प्रसार सुरू आहे. या कालावधीत कोरोनाच्या तीन लाटा आल्या. यापैकी दुसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या ११ हजारावर पोहचली होती या दरम्यान दिवसाला सर्वाधिक १६०० मॅट्रिक टन ऑक्सिजन लागले. तर तिसऱ्या लाटेत रोजची रुग्णसंख्या २० हजारावर पोहचली मात्र यादरम्यान सर्वात कमी ३०० ते ४०० मॅट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागली. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत कमी प्रमाणात ऑक्सिजन ( demand for oxygen decreases in mumbai ) लागले तसेच रुग्णसंख्या कमी झाली असल्याने परिस्थिती पाहून कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला जाईल अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

ऑक्सिजनची मागणी घटली -

मुंबईमध्ये ११ मार्च २०२० ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार आहे. कोरोनाची ही पहिली लाट होती. या लाटेत एका दिवसात सर्वाधिक २८०० रुग्णांची नोंद झाली. यावेळी रोजची ऑक्सिजनची मागणी ९०० मेट्रिक टन पर्यंत पोहचली होती. एप्रिल २०२१ मध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरु झालाय. यावेळी ऑक्सिजनची रोजची मागणी १,६०० मेट्रिक टन पर्यंत पोहोचली होती. डिसेंबर २०२१ पासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली. २१ डिसेंबरपासून तिसरीला लाट सुरु झाली. ६ ते ८ जानेवारी २०२२ दरम्यान रोजची रुग्णसंख्या २० हजारावर गेली. या तिसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनची रोजची मागणी ३०० ते ४०० मेट्रिक टनावर पोहोचली. त्यामुळे दोन्ही लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली असली तरी ऑक्सिजनची रोजची मागणी घटल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.

परिस्थितीनुसार कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय ! -

मुंबईत डिसेंबरमध्ये कोरोनाची तिसरी लाट आली. ही लाट महिनाभरातच ओसरत आहे. त्यामुळे रुग्णालयांवरील रुग्णांचा भार कमी झाला आहे. असे असतानाही कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी बांधण्यात आलेले जंबो कोविड सेंटर सुरू ठेवण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. ३१ मार्चनंतर कोरोनाची स्थिती पाहूनच ही जंबो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा -PM Modi Criticizes Cong : पंतप्रधानांची कॉंग्रेसवर टीका, म्हणाले- मुंबईतील कोरोना बिहार-उत्तर प्रदेशात पसरवला

ABOUT THE AUTHOR

...view details