महाराष्ट्र

maharashtra

Deepali Syed Criticized Raj Thackeray : 'राज ठाकरे यांना भीती वाटत असेल, तर आदित्य ठाकरेंसोबत अयोध्येत जावं'

By

Published : May 18, 2022, 8:12 PM IST

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Ayodhya Visit ) यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ५ जूनला अयोध्येला जाणार आहे. राज यांच्या दौऱ्याला अयोध्येत तीव्र विरोध सुरु आहे. शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद ( Deepali Syed Criticized Raj Thackeray ) यांनी राज ठाकरेंवर पत्रकार ( Deepali Syed Press Conference ) परिषदेत निशाणा साधला.

Deepali Syed Criticized Raj Thackeray
Deepali Syed Criticized Raj Thackeray

मुंबई -महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Ayodhya Visit ) यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेऊन ५ जूनला अयोध्येला जाणार आहे. राज यांच्या दौऱ्याला अयोध्येत तीव्र विरोध सुरु आहे. शिवसेना प्रवक्त्या दिपाली सय्यद ( Deepali Syed Criticized Raj Thackeray ) यांनी राज ठाकरेंवर पत्रकार परिषदेत निशाणा साधला. ज्यांचे राजकारण दोन तालुक्यांचे आहे. ते शिवसेनेला नोटाचे राजकारण काय शिकवणार? तुम्हाला अयोध्येत जायची भीती वाटत असेल तर शिवसेनेसोबत जा, सेनेचा धाक तिथे आजही कायम आहे, अशी टीका सय्यद यांनी केली. आता मनसे याला काय प्रत्युत्तर देणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे मेळाव्यात मशिंदीवरील भोंग्यांबाबत आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण चांगलंच तापले आहे. राज यांच्यावर शिवसेनेसह विरोधकांनी टीकेची झोड उठवली. हिंदुत्त्वाचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवणाऱ्या राज यांना भाजप खासदाराने अयोध्येत येण्यास मनाई केली आहे. राजकीय चर्चांना यावरुन उधाण आले असताना, शिवसेनेच्या प्रवक्त्या दिपाली सय्यद यांनी राज ठाकरे यांना छेडले आहे.

काय म्हणाल्या दिपाली सय्यद -राज ठाकरे यांचे दोन तालुक्या पुरतेच आहे. शिवसेनेचा आजही दबदबा आहे. राज ठाकरे पाच तारखेला अयोध्येला जात आहेत. त्यांनी क्षमा मागितली तर त्यांना जाऊ दिले जाईल. जर राज ठाकरे तिथे गेले आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर आघात झाला, तर तुम्ही जबाबदार घेणार आहात का? काही वर्षांपूर्वी तुम्ही यूपीच्या लोकांना बाहेर काढले. तुम्ही आदित्य ठाकरे यांचा हात पकडा आणि जा. कांचनगिरी म्हटल्या प्रमाणे खेद व्यक्त केले, मग ते राज ठाकरे कुठे गेले आहेत? मनसे ही भाजपची टीम आहे, असे सांगत दिपाली सय्यद यांनी मनसेवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच महाविकास आघाडीने ज्या पद्धतीने काम केले, हे लोकांनी पाहिले आहे. महाविकास आघाडी चांगले काम करत आहे. मी हिंदू आहे म्हणून का सांगावे लागते. विरोधक बरळत असतात. मी वेगवेगळ्या नावाने कधीही निवडणूक लढली नाही. माझे आधार कार्डदेखील सय्यद असल्याचे त्या म्हणाल्या.

हेही वाचा -MVA Government Failure : महाविकास आघाडी सरकार आतापर्यंत केंव्हा केंव्हा पडले तोंडघशी? वाचा सविस्तर...

ABOUT THE AUTHOR

...view details