महाराष्ट्र

maharashtra

Aaditya Thackeray on Dahi Handi दहीहंडी उत्सवात राजकारण कशाला आणता, आदित्य ठाकरेंनी राम कदमांना सुनावले

By

Published : Aug 19, 2022, 8:45 PM IST

उद्धव ठाकरेंचे सरकार हे हिंदुत्वविरोधी होते, अशी राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात केली. यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे Yuva Sena chief Aditya Thackeray यांनी आम्ही हिंदूविरोधी असू, तर सणात राजकारण तुम्ही का आणताय, असा खोचक टोला भाजप आमदार राम कदमांना BJP MLA Ram Kadam लगावला.

Dahihandi festival 2022
दहीहंडी उत्सव

मुंबई - कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी निर्बंध लावल्याने सण उत्सव साजरे करता आले नाहीत. हाच धागा पकडून, शिवसेनेला धर्म विरोधी Shiv Sena anti religion असल्याची टीका भाजपने केली आहे. भाजपचे आमदार राम कदम BJP MLA Ram Kadam यांनी आज पुन्हा शिवसेनेला यावरून डिवचले. यावर शिवसेनेचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे Yuva Sena chief Aditya Thackeray यांनी कदम यांचा चांगलाच समाचार घेतला. आम्ही हिंदूविरोधी असू, तर सणात राजकारण तुम्ही का आणताय, असा खोचक टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Chief Minister Eknath Shinde यांच्या ५० थरांच्या हंडीच्या टीकेलाही जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेना भवन परिसरात शिवसेनेच्यावतीने निष्ठा हंडीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.

दहीहंडी उत्सव
सणात राजकारण आणू नकागेली दोन वर्षे सातत्याने शिवसेनेकडून उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले. तसेच उद्धव ठाकरेंचे सरकार हे हिंदुत्वविरोधी होते, अशी राम कदम यांनी घाटकोपर येथील दहीहंडी उत्सवात केली. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना याबाबत छेडले असता, आजचा दिवस सणाचा दिवस आहे. मला प्रत्येक गोष्टीत राजकारण आणण्याची गरज वाटत नाही. ठिक आहे आम्ही हिंदुत्वविरोधी असू तुमचे धर्मावर जास्त प्रेम असेल तर तुम्ही सणात राजकारण का आणत आहात, असा खोचक टोला आदित्य ठाकरे यांनी लगावला. तसेच धर्मावर प्रेम असलेले सणात राजकारण आणणार नाही अशी आमची अपेक्षा आहे. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी राहू द्या, आज सण आहे तो सणासारखा साजरा होऊ देत, अशा मोजक्या शब्दांत ठाकरे यांनी आपली सडेतोड प्रतिक्रिया दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details