महाराष्ट्र

maharashtra

Bitcoin Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉइनचा दर २० हजारांवर.. पहा आजचे दर

By

Published : Jul 14, 2022, 6:56 AM IST

गेल्या २४ तासांत बिटकॉइनच्या दरांमध्ये ०.१५ टक्क्यांनी वाढ झाली ( Todays Bitcoin Rate ) आहे. गेल्या दोन महिन्यापासून बिटकॉइनच्या किमतीत घसरण सुरु आहे. त्यामुळे बिटकॉइनच्या गुंतवणूकदारांची चिंता पुन्हा वाढली आहे. बिटकॉइन गेल्या आठवड्यात सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला होता. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख १५ हजार ९८२ रुपये इतकी आहे.

CRYPTOCURRENCY PRICES TODAY 14 JULY 2022
आंतरराष्ट्रीय बाजारात बिटकॉइनचा दर २० हजारांवर.. पहा आजचे दर

मुंबई :बिटकॉइन ( BTC ) आणि इतर क्रिप्टो शेअर्सच्या दरांमध्ये ऐतिहासिक अशी घसरण झाल्यानंतर बिटकॉइन आतापर्यंतच्या सर्वात नीचांकी पातळीवर पोहोचला आहे. तीन आठवड्यापूर्वी बिटकॉइनची किंमत जवळपास ६ लाखांनी घसरली होती. बिटकॉइन या महिन्यातही पुन्हा एकदा घसरणीच्या मार्गावर ( Todays Bitcoin Rate ) आहे. गुंतवणूकदारांचा प्रतिसाद कमी असल्याने दर सातत्याने उतरत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे. आज भारतीय बाजारात एका बिटकॉइनची किंमत १६ लाख १५ हजार ९८२ रुपये इतकी आहे. कालच्या तुलनेत आज बिटकॉइनचे भाव थोडे वधारले आहेत.

आजचा बिटकॉइनचा दर

आज बिटकॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० हजार २७५ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात १६ लाख १५ हजार ९८२ रुपये इतका आहे.

आजचा इथेरिअम कॉईनचा दर

आज इथेरिअम कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात १ हजार १८४ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ८८ हजार ८७९ रुपये इतका आहे.

आजचा डोज कॉईनचा दर

आज डोज कॉइनचा दर आंतरराष्ट्रीय बाजारात ०.०६१ डॉलर इतका आहे. तर हाच दर भारतीय बाजारात ४.९० रुपये इतका आहे.

हेही वाचा :Gold Silver Rates : सोने - चांदीची झळाळी उतरली.. चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण

ABOUT THE AUTHOR

...view details