महाराष्ट्र

maharashtra

Maharashtra Leaders Controversial Statement : 'या' नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यात निर्माण झाला तणाव, वाचा सविस्तर

By

Published : Apr 27, 2022, 10:38 PM IST

मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानात हनुमान चालीसा ( Uddhav Thackeray ) पठण करण्याचा अट्टहास ( Hanuman Chalisa ) राणा दांपत्याने धरला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यभरात तणाव निर्माण झाला होता. मुंबईतही शिवसैनिक मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. अशीच तणाव निर्माण करणारी वक्तव्य गेल्या काही दिवसांत ( Controversial Statement By Leders In Maharashtra ) ज्या नेत्यांकडून केली गेली आहेत.

Maharashtra Leaders Controversial Statement
Maharashtra Leaders Controversial Statement

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांच्या घरातच हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa ) करायचे आहे, असा अट्टाहास राणा दांपत्याने धरला. मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार यासाठी अमरावती ते मुंबई प्रवासही नकळत राणा दाम्पत्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसैनिक चांगलेच ( Shivsena Attacked On Rana ) आक्रमक झाले होते. राणा दांपत्य आणि शिवसैनिकांमध्ये वाद जवळपास दोन दिवस रंगला असून शेवटी राणा दाम्पत्याने केलेल्या आवाहनानंतर पोलिसांकडून ( Navneet Rana Arrest ) त्यांना अटक करण्यात आली. मात्र, राणा दाम्पत्याने थेट मुख्यमंत्र्यांना दिलेल्या आव्हानानंतर महाराष्ट्रात एकच गोंधळ झालेला पाहायला मिळाला. विरोधक आणि सत्तेत असलेल्या काही नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अशा प्रकारचा गोंधळ महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर नेहमीच पाहायला मिळाला. आतापर्यंत अशी वादग्रस्त वक्तव्य करून कोण कोणत्या नेत्यांनी वातावरणात तणाव निर्माण केला होता त्याबाबत घेतलेला हा सखोल आढावा.

नारायण राणे ( Narayan Rane ) -राणे कुटुंबियांकडून नेहमीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेच्या नेत्यांबाबत तिखट प्रतिक्रिया केल्या जातात. नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यानंतर महाराष्ट्रात त्यांचा असलेला पहिलाच दौऱ्यावेळी नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कानशिलात लगावल्या याबाबत वक्तव्य केलं होतं. त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर ही राज्यभरात तणाव पाहायला मिळाला होता. नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचासाठी शेवटी केंद्रीय मंत्री असूनही राणे यांना 24 ऑगस्ट 2021 ला रत्नागिरीमध्ये अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर त्यांना तत्काळ जामीन मिळाला असला तरी या अटकेमुळे महाविकास आघाडी सरकार आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच तणाव वाढला होता.

नाना पटोले ( Nana Patole ) -20 जानेवारी 2022 ला 'आपण मोदी ला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो' असं वादग्रस्त वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं होतं. भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना काही स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलताना नाना पटोले यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले होते. मात्र, हे वक्तव्य आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलं नसून मोदी हा तेथील स्थानिक गावगुंड आहे. त्या गावगुंडाने स्थानिक लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळेच आपण असे वक्तव्य केले असल्याचे स्पष्टीकरण नाना पटोले यांनी त्यानंतर प्रसारमाध्यमांना दिले होते. मात्र, नाना पटोले यांनी जाणून-बुजून हे वक्तव्य केले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हे असल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला. या वक्तव्याच्या निषेधार्थ आणि नाना पटोले यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाकडून राज्यभरात ठिकाणी आंदोलनेही केली गेली.

अमोल मिटकरी ( Amol Mitkari ) -राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद यात्रेच्या समारोपावेळी कोल्हापूरच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी लग्नाच्या वेळी ब्राह्मणाकडून केला जाणारा मंत्र उच्चाराबाबत मिश्किल टिप्पणी केली होती. यावेळी मंचावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मंत्री धनंजय मुंडे हे देखील उपस्थित होते. राज्यातील दोन्ही मोठ्या नेत्यांसमोर अशा प्रकारे ब्राह्मण समाजावर केली जाणाऱ्या टिप्पणीवर निषेध ब्राह्मण समाजाकडून नोंदवण्यात आला. तसेच या विरोधात पुण्यामध्ये ब्राह्मण समाजाकडून जोरदार आंदोलनही करण्यात आले होते.

गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte ) -ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत नेहमीच चर्चेत राहिले आहेत. मात्र, एसटी आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी केलेल्या भाषणातून अनेक वेळा तणाव निर्माण झाला होता. राज्यातील ज्येष्ठ नेते शरद पवार तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान देण्याची भाषा त्यांनी आपल्या भाषणातून वेळोवेळी केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी या वक्तव्याचा निषेध केला होता.

भाजप आमदार प्रसाद लाड ( Prasad Lad )- एक ऑगस्ट 2019 रोजी भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी शिवसेना भवन फोडण्याचा इशारा एका कार्यक्रमादरम्यान दिला होता. काही दिवसांपूर्वीच दादर येथे झालेल्या एका कार्यक्रमात भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला होता. दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षाला अनुसरून भविष्यात शिवसेनाभवनही फोडलं जाऊ शकतो, असा इशारा आमदार प्रसाद लाड यांनी दिला. मात्र, त्यांनी दिलेल्या या इशाऱ्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. मात्र, भाषणाच्या ओघात आपल्याकडून असे शब्द चुकून गेले असून त्याबाबत प्रसाद लाड यांनी नंतर दिलगिरीही व्यक्त केली होती.

हेही वाचा -कोविड लॉकडाऊनमध्ये असुरक्षित सेक्स: एड्सची लागण होण्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक, देशात ८५ हजार जणांना एड्स

ABOUT THE AUTHOR

...view details