महाराष्ट्र

maharashtra

शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल - नाना पटोले

By

Published : Jul 15, 2021, 3:11 PM IST

एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केले आहे.

congress leader nana patole
congress leader nana patole

मुंबई - महाविकास आघाडी सरकार (mahavikas aaghadi) निर्माण करताना शरद पवार (sharad pawar) यांनी मुख्य भूमिका निभावली होती. तसेच महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. सरकारमधील प्रशासकीय कामे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार (ajit pawar) आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) यांच्याकडून होत असतात. मात्र एक प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आहेत. त्यामुळे आघाडी सरकारचे रिमोट कंट्रोल शरद पवार असल्याचे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी केले आहे.

हेही वाचा -आम्ही सरकार एकत्र चालवतो, पक्ष नाही - शरद पवार

'आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत'

आघाडी सरकारमध्ये असलेल्या तिनही पक्षामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्याच अधिकाराखाली मी माझा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. शरद पवार हे त्यांचा पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आपला पक्ष वाढवत असताना, कोणालाही त्याचे दुःख होण्याचे कारण नाही, असे स्पष्टीकरणदेखील नाना पटोले यांनी केले आहे.

हेही वाचा -आपल्याच चक्रव्युहात अडकले नाना पटोले: राष्ट्रवादी, सेनेकडून सुरू आहे टीकेचा भडीमार

शरद पवार हे नाना पाटोलेंवर नाराज असल्याची चर्चा

नाना पटोले यांच्या वेगवेगळ्या वक्तव्यावरून शरद पवार हे नाना पटोले यांच्यावर नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील (h k patil) आणि मंत्री अशोक चव्हाण (ashok chavan) आणि बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. मात्र प्रदेशाध्यक्ष असूनही नाना पटोले या भेटीदरम्यान उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या. तसेच नाना पटोले हे लहान नेते आहेत, त्यामुळे त्यांच्यावर मी भाष्य करणार नाही, असे वक्तव्य शरद पवार यांनी याआधी केले होते. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस(NCP)ने काँग्रेस(conngress)ला धोका दिला असल्याचे खळबळजनक वक्तव्य नाना पटोले यांच्याकडून करण्यात आले. त्यामुळे शरद पवार आणि नाना पटोले यांच्यात वाद सुरू आहेत का, असे प्रश्न आघाडी सरकारमध्ये उपस्थित केले जात होते.

ABOUT THE AUTHOR

...view details