महाराष्ट्र

maharashtra

Mumbai CP Sanjay Pandey : पोलीस आयुक्त यांच्याकडून मुंबईकरांना खुशखबरी, आता 'नो पार्किंग'मधील वाहने टो नाही करणार

By

Published : Mar 5, 2022, 8:14 PM IST

Updated : Mar 5, 2022, 9:01 PM IST

संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी नुकताच मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी मुंबईकरांसाठी एक खुशखबर दिली आहे. आता मुंबईकरांची नो पार्किंगमधील वाहने पोलिसांकडून टो करण्यात येणार नाही. म्हणजेच नो पार्किंमधून वाहने उचलल्यानंतर वाहनधारकांचा होणार त्रास आता कमी होणार आहे.

संजय पांडे
संजय पांडे

मुंबई -संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी नुकताच मुंबई पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला. त्यांनी मुंबईकरांसाठी एक खुशखबर दिली आहे. आता मुंबईकरांची नो पार्किंगमधील वाहने पोलिसांकडून टो करण्यात येणार नाही. म्हणजेच नो पार्किंमधून वाहने उचलल्यानंतर वाहनधारकांचा होणार त्रास आता कमी होणार आहे.

मुंबईकरांना उद्देशून एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमधून त्यांनी वाहने उचलून नेणे थांबवत आहोत असे म्हटले आहे. मुंबईकरांनी जर नियमांचे पालन केले तर अशी कारवाई करणे थांबवली जाईल, असे म्हटले आहे. यातच रस्त्यांवर वाहन पार्किंगसाठी जागा नसल्याने अनेकवेळा वाहनधारक कळत नकळत वाहने नो पार्किंगमध्ये लावतात. मग पोलीस ते टो करून घेऊन जातात. यासंदर्भातच आता मुंबईचे नवीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी मोठे पाऊल उचलत वाहनधारकांना गोड बातमी दिली आहे. संजय पांडे यांनी ट्विट करत सांगितले आहे की, मुंबईत वाहतूक पोलिसांकडून वाहन टोईंग थांबण्यात आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ट्वीट करत म्हणाले, प्रिय मुंबईकरांनो आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मी भारावून गेलो आहे. सर्वांत आधी आम्ही वाहने उचलून नेणे थांबवित आहोत. सर्वांनी जर नियमांचे पालन केले तर प्रायोगिक तत्त्वावरील हा प्रयोग नियमित करण्यात येईल.

पुन्हा वाहन टोईंग होऊ शकते सुरू...? -हा निर्णय जाहीर करतानाच त्यांनी न बोलताच नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांना इशारा दिला आहे. हा सध्या तात्पुरती स्वरूपात राबविण्यात आलेला प्रयोग असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे. म्हणजेच वाहतूक पोलिसांकडून वाहने उचलणे थांबवले असून वाहनधारक बेशिस्तपणे रस्त्यात कुठेही वाहन पार्क केल्यास वाहन टोईंग पुन्हा सुरू करण्यात येऊ शकते.

हेही वाचा -Order to inspect : नागपुरातील २१ गावांमधील पाण्याचे स्त्रोत प्रदूषित

Last Updated :Mar 5, 2022, 9:01 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details