महाराष्ट्र

maharashtra

Sajeevani Karndikar : 'ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले'; संजीवनी करंदीकर यांच्या निधनावर मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला शोक

By

Published : May 13, 2022, 3:29 PM IST

cm Uddhav Thackeray
cm Uddhav Thackeray ()

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे वृद्धापकाळाने आज ( 13 मे ) पुण्यात निधन ( Balasaheb Thackeray Sister Passes Away ) झाले.

मुंबई -थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भगिनी संजीवनी करंदीकर यांचे वृद्धापकाळाने आज ( 13 मे ) पुण्यात निधन ( Balasaheb Thackeray Sister Passes Away ) झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला ( Uddhav Thackeray Expressed Grief Sanjeevani Karandikar Passes Away ) आहे. दरम्यान, ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले, अशी भावना व्यक्त केली.

शेवटचा दुवा निखळला -संजीवनी करंदीकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आत्या होत्या. 'प्रबोधनकार आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा समृद्ध वारसा त्यांना लाभला होता. त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. प्रबोधनकार ठाकरे यांच्याप्रमाणेच त्या परखड होत्या. वाचनाचा अफाट छंद त्यांना होता. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवा निखळला,' अशा दुःखद भावना मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केल्या.

मायेचे छत्र गमावले - 'संजू आत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगायच्या. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजू आत्यावर विशेष लोभ होता. त्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. मात्र, आज त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले,' असे सांगत मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

हेही वाचा -Sharad Pawar : पाकिस्तानचा सामान्य माणूस आपला विरोधक नाही : शरद पवार

ABOUT THE AUTHOR

...view details