महाराष्ट्र

maharashtra

IPS Deven Bharti : आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना क्लिन चिट, काय आहे प्रकरण ?

By

Published : Oct 11, 2022, 2:23 PM IST

मुंबई गुन्हे शाखेच्या इंटेलिजेन्स युनिटने अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती आणि निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट दिली ( Clean chit to IPS officer Deven Bharti ) आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरूद्ध कुठलेही पुरावे नसल्याचे, सीआययुने म्हटले आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम खान यांच्या पत्नी रेश्मा खैराती खान यांच्या विरोधात मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात मुंबई सीआयुतर्फे 500 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आला आहे.

Clean chit to IPS officer Deven Bharti
मुंबई गुन्हे शाखेच्या इंटेलिजेन्स युनिटने आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट दिली आहे.

मुंबई - मुंबई गुन्हे शाखेच्या इंटेलिजेन्स युनिटने अतिरिक्त पोलीस महासंचालक देवेन भारती आणि निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक फटांगरे यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट दिली ( Clean chit to IPS officer Deven Bharti ) आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांविरूद्ध कुठलेही पुरावे नसल्याचे, सीआययुने म्हटले आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम खान यांच्या पत्नी रेश्मा खैराती खान यांच्या विरोधात मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयात मुंबई सीआयुतर्फे 500 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले ( charge sheet against Reshma Khan in court ) आहे.

मुंबई गुन्हे शाखेच्या इंटेलिजेन्स युनिटने आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना पासपोर्ट प्रकरणात क्लीन चिट दिली आहे.

आरोप चुकीच्या हेतूने - मिळाल्या माहिती प्रमाणे भारती आणि फटांगरे यांच्या विरोधात कोणतेही पुरावे नाहीत आणि एफआयआरमध्ये या दोघांविरुद्धचे आरोप चुकीच्या हेतूने केले गेले असल्याचे, सीआययुने म्हटले आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते हैदर आझम खान यांच्या पत्नी रेश्मा खैराती खानने जन्म प्रमाणपत्र खोटे बनवून भारतीय पासपोर्ट प्राधिकरणाला दिल्याबद्दल आरोप आहे. रेशमावर ती बांगलादेशी नागरिक असल्याचा आरोप खोटा असल्याचे आढळून आले असून ती बिहारची असल्याची आरोप पत्रात म्हटले आहे.



डिसेंबर 2021 मध्ये गुन्हा दाखल - मालवणी पोलिसांनी डिसेंबर २०२१ मध्ये देवेन भारती, रेश्मा खान आणि दिपक फटांगरे यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि पासपोर्ट कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. देवेन भारती त्यावेळी सहपोलीस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था ) पदावर ( Assistant commissioner of police deven bharati ) होते. त्यांच्यावर विशेष शाखेच्या एका पोलीस निरीक्षकावर रेश्मा विरुद्ध प्रकरणाचा पाठपुरावा न करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला होता. बोगस जन्म प्रमाणपत्राच्या मदतीने बेकायदेशीरपणे भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा रेश्मावर आरोप होता.

ABOUT THE AUTHOR

...view details