महाराष्ट्र

maharashtra

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक, 'सीएबी' आणि 'एनआरसी' विधेयक संविधान विरोधी - तिस्ता सेटलवाड

By

Published : Dec 12, 2019, 10:22 PM IST

नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात असून हे संसदेने संमत केल्याचे तिस्ता सेटलवाड म्हणाल्या. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असेही त्या म्हणाल्या.

citizenship-amendment-bill-is-against-the-constitution-said-teesta-settlewad
सामाजिक कार्यकर्ते तिस्ता सेटलवाड

मुंबई - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात असूनही संसदेने संमत केले आहे. हे विधेयक सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही, असे तिस्ता सेटलवाड म्हणाल्या. राज्यसभेत मांडण्यात आलेल्या सीएबी आणि एनआरसी विधेयक संविधानाविरोधात आहे. ही दोन्ही विधेयके संविधानात दिलेल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष या तत्वांशी फारकत घेतात. यामुळे एक सजग भारतीय नागरिक म्हणून या विधेयकाला विरोध करत आहोत, असे तिस्ता सेटलवाड यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले.

सामाजिक कार्यकर्ते तिस्ता सेटलवाड

या विधेयकाला कडाडून विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आता त्याविरोधात न्यायालयात आव्हान द्यायचे ठरवले आहे. या विधेयकाद्वारे मुस्लिमांमध्ये भेदभाव केला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या कायद्यामुळे आंतरराष्ट्रीय संबंधावर देखील परिणाम होईल, त्यामुळे आम्ही या कायद्याविरोधात मोठा संवैधानिक पद्धतीने लढा उभा करू, असे सेटलवाड यांनी म्हटले आहे.

Intro: नागरिकत्व दुरुस्ती विधेयक हे विधेयक पूर्णपणे राज्यघटनेच्या विरोधात असून संसदेने संमत केले आहे, तरी ते सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही-तीस्ता सेटलवाड

तसेच राज्यसभेत मांडण्यात आलेल्या 'सीएबी' आणि 'एनआरसी' विधेयक संविधानाविरोधात आहे

दोन्हीही बिले संविधानात दिलेल्या समाजवादी, धर्मनिरपेक्ष या तत्वांशी फारकत घेते तसेच संविधानाच्या विरोधात आहेत

तेव्हा एक सजग भारतीय नागरिक म्हणून या विधेयकाला विरोध कर आहोत असे तिस्ता सेटलवाड यांनी आज पत्रकार परिषद घेत सांगितले.



या विधेयकाला कडाडून विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या विधेयकाला आता कोर्टात आव्हान द्यायचे ठरवले आहे.

या विधेयकाद्वारे मुस्लिमांमध्ये भेदभाव केला जात असल्याचे म्हणणे आहे.

या कायद्यामुळे आंतराष्ट्रीय संबंधावर देखील परिणाम होईल त्यामुळे आम्ही या कायद्या विरोधात एक मोठा संविधानिक पद्धतीने लढा उभा करू असे सेटलवाड यांनी म्हटले

Body:।Conclusion:।

ABOUT THE AUTHOR

...view details