महाराष्ट्र

maharashtra

'केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर आकस, म्हणूनच चित्ररथाला नाकारली परवानगी'

By

Published : Jan 2, 2020, 4:59 PM IST

केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यांच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. यामुळे खासदार सुप्रिया सुळे आणि कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सरकारचा निषेध केला.

Supriya Sule and Jitendra Awhad
सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड

मुंबई -प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या अत्यंत महत्वाच्या अशा दोन्ही राज्यातील चित्ररथाना केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून खंत व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्याच्या चित्ररथाला परवानगी नाकारली, जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला निषेध

हेही वाचा... वर्धा जिल्ह्याला गारपीट, पावसाचा तडाखा; कापूस, तूरसह संत्रा पिकांचे नुकसान

ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?

सुप्रिया सुळे यांनी या संदर्भात दोन ट्विट केले आहे.
"प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय.", असे त्यांनी आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटलंय. तस, दुसऱ्या एका ट्विटमध्ये केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणतात की, "महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध."

हेही वाचा... नववर्षदिनी जगात भारतात झाला सर्वाधिक बालकांचा जन्म

दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या आणि पश्‍चिम बंगालचा चित्ररथला प्रजासत्ताक दिनाच्या संचालनालयात नाकारणे हे गंभीर आहे. त्यातही महाराष्ट्राचा रथ नाकारणे म्हणजे हा आमच्या राज्याच्या अस्मितेचा अपमान आहे. आपल्या विचारांचा आणि महाराष्ट्राचा चित्ररथ या मागील ७० वर्षापासून जात आहे. अनेकदा त्याची प्रतिमा उंचावलेली दिसते. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारून भारतीय संघराज्याच्या मुळ गाभ्याला धक्का लावला, अशी टीकाही त्यांनी केली. एखादी गोष्ट तुमच्या विरोधात असेल तर त्यांचा रस घ्यायचा नाही हे खर तर एक प्रकारची बालिशपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.

Intro:
केंद्र सरकारने महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी केला निषेध

mh-mum-01-supriyasule-avhad-chitrarath-7201153

मुंबई, ता. २ :

26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीत होणाऱ्या संचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल राज्यातील अत्यंत महत्वाच्या अशा दोन्ही चित्ररथाना केंद्र सरकारने परवानगी नाकारली आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून खंत व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते व मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याविषयी केंद्र सरकारच्या भूमिकेवर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे.
सुळे यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की,
"प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली.हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे.परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय."
त्यानंतर त्या त्यांनी दुसऱ्या एका ट्विट मध्ये केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे. त्या म्हणतात की, "महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे.या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे.केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध."
दरम्यान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारच्या कृतीचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.

महाराष्ट्राच्या आणि पश्‍चिम बंगालचा चित्ररथला प्रजासत्ताक दिनाच्या संचालनालयात नाकारणे हे केंद्र गंभीर आहे. त्यातही महाराष्ट्राचा रथ नाकारणे म्हणजे हा आमच्या राज्याच्या अस्मितेचा अपमान आहे. आपल्या विचारांचा आणि महाराष्ट्राचा चित्ररथ या मागील ७० वर्षापासून जातोय अनेकदा त्याची प्रतिमा उंचावलेली दिसते. परंतु केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राच्या चित्ररथाला नाकारून भारतीय संघराज्याच्या मुळ गाभ्याला धक्का लावला अशी टीकाही त्यांनी केली.एखादी गोष्ट तुमच्या विरोधात असेल तर त्यांचा रस घ्यायचा नाही हे खर तर एक प्रकारची बालिशपणा असल्याची टीकाही त्यांनी केली.Body:केंद्र सरकारने महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या चित्ररथाला परवानगी नाकारली, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड यांनी केला निषेधConclusion:

ABOUT THE AUTHOR

...view details