महाराष्ट्र

maharashtra

Anil Deshmukh Case : अनिल देशमुखांच्या बॉम्बे क्लब सदस्यत्वाची सीबीआयने मागितली माहिती

By

Published : Apr 25, 2022, 3:36 PM IST

अनिल देशमुख यांच्या सदस्यत्वाशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच सभासद शुल्क आणि 2019, 2020 आणि 2021 मध्ये भरलेल्या थकबाकीच्या पावत्या जमा करण्यासंदर्भात सीबीआयने बॉम्बे क्लब मॅनेजमेंटला पत्र पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआयने अटक केल्यानंतर 15 दिवसाच्या आत बॉम्बे क्लबला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच अनिल देशमुख यांच्या संदर्भात माहिती मागण्यात आली होती.

अनिल देशमुख प्रकरण
अनिल देशमुख प्रकरण

मुंबई -शंभर कोटी वसुली प्रकरणात तपास करत असलेल्या केंद्रीय अन्वेषण ब्युरोने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील प्रकरणात अधिक सखोल तपास करण्याकरिता सीबीआयने टोनी साऊथ बॉम्बे क्लबचे सदस्य असलेले अनिल देशमुख यांच्या संबंधित सदस्यत्वाच्या संदर्भातील माहिती बॉम्बे क्लबकडून मागितली आहे. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे.

अनिल देशमुख यांच्या सदस्यत्वाशी संबंधित सर्व कागदपत्रे तसेच सभासद शुल्क आणि 2019, 2020 आणि 2021 मध्ये भरलेल्या थकबाकीच्या पावत्या जमा करण्यासंदर्भात सीबीआयने बॉम्बे क्लब मॅनेजमेंटला पत्र पाठवले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल देशमुख यांना सीबीआयने अटक केल्यानंतर 15 दिवसाच्या आत बॉम्बे क्लबला नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तसेच अनिल देशमुख यांच्या संदर्भात माहिती मागण्यात आली होती. अनिल देशमुख क्लबचा सभासद कसा झाला? त्याची क्लबशी ओळख कोणी करून दिली? त्याची सदस्यत्वाची थकबाकी कोणी भरली? पैसे रोख स्वरूपात दिले गेले का? अनिल देशमुख यांच्या संदर्भात तपासात काही धागेदोरे मिळू शकतात का यासंदर्भात सीबीआय शोध घेत आहे. यामुळे सीबीआयला तपासाची व्याप्ती वाढविण्यात मदत होऊ शकते आणि मंत्री म्हणून देशमुख यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केला होता, असे माहितीच्या आधारावर सीबीआय तपास करत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 91 अन्वये जारी केलेल्या नोटिसांनुसार, CBI ने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित कोणताही कागद मागवला आहे. जो क्लबच्या ताब्यात असेल. कलम 91, इतर गोष्टींबरोबरच, चौकशीसाठी आवश्यक कागदपत्रे विचारण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या अधिकाराशी संबंधित आहे. अनिल देशमुख यांना एप्रिल महिन्यामध्ये सीबीआयकडून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी कट प्रकरणी अटक करण्यात आली होती. गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल सीबीआय देशमुख यांची चौकशी करत आहे. अनिल देशमुख यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मोबदला मिळाला असल्याचा आरोप देखील सीबीआयने केला आहे.

हेही वाचा -All-Party Meeting : भोंग्यांच्या मुद्द्यावर सर्वक्षीय बैठक; मात्र प्रमुख नेत्यांची दांडी

ABOUT THE AUTHOR

...view details