महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona News : मुंबई कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ

By

Published : Dec 27, 2021, 4:54 PM IST

मुंबईतील कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढत आहे (Mumbai corona Cases Increased ). गेल्या एक महिन्याच्या कालावधीत रुग्णांमध्ये तीन पट वाढ नोंदवण्यात आली आहे. तर आतापर्यंत सातवेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे ( Corona Patient Deaths In Mumbai ).

मुंबई कोरोना रुग्णसंख्या
मुंबई कोरोना रुग्णसंख्या

मुंबई -मुंबई शहर आणि उपनगरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना ( Mumbai Corona Cases Increased ) दिसून येत आहे. रुग्ण दुपटीच्या कालावधीत अडीच पटीने घसरला असून, रुग्णसंख्येत तीन पट वाढ झाली आहे. दरम्यान, रविवारी 922 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली.

1 डिसेंबरला 1904 सक्रीय बाधितांसह रुग्णवाढीचा दर 0.02 टक्के होता. तर 26 डिसेंबरला त्यात वाढ होऊन 4295 सक्रीय ( Mumbai Corona Active Patient ) बाधितांसह रुग्णवाढीचा दर 0.06 टक्के नोंदवण्यात आला. तसेच, आतापर्यंत 7 लाख 71 हजार 112 कोरोना संसर्गित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यातील 7 लाख 47 हजार 864 रुग्ण बरे झाले आहेत. तर 16 हजार 370 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के ( Corona Patient Recovery Rate In Mumbai ) झाले आहे.

रुग्णसंख्या वाढली; मृत्यू शुन्यावर

जून महिन्यापासून घटलेल्या रुग्णसंख्येत वाढ होऊन 1 डिसेंबरला कोरोनाचे 108 नवे रुग्ण आढळून आले होते. 2 डिसेंबरला 228 रुग्ण, 4 डिसेंबरला 228, 8 डिसेंबरला 250, 11 डिसेंबरला 256, 16 डिसेंबरला 279, 17 डिसेंबरला 295, 18 डिसेंबरला 283, 19 डिसेंबरला 336, 21 डिसेंबरला 327, 22 डिसेंबरला 490, 23 डिसेंबरला 602, 24 डिसेंबरला 683, 25 डिसेंबर 757 नवीन रुग्ण सापडले. तसेच, कोरोनाची प्रकोप सुरु झाल्यापासून आतापर्यंत सातवेळा शून्य मृत्यूची ( Corona Patient Deaths In Mumbai ) नोंद झाली आहे.

ओमायक्रॉनचा धोका वाढला

1 ते 26 डिसेंबर पर्यंत मुंबई विमानतळावर 12,241 अति जोखीमीच्या देशातून आले. त्यातील १२४ प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या कोरोनाबाधितांच्या संपर्कातील 22 रुग्णांना संसर्गाची लागण झाली. त्यातील 74 (41 पुरुष, 33 स्त्री) जणांना ओमायक्रॉनची बाधा ( Mumbai Omicron Cases ) झाल्याचा अहवाल महापालिक प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यातील एकूण ७४ पैकी ३९ रुग्ण मुंबईबाहेरील आहेत.

महापालिका प्रशासन सज्ज

रुग्णवाढीची शक्यता असल्याने चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. पालिका रुग्णालतील 13 हजार खाटांसह कोविड सेंटरमध्ये 17 हजार बेडस असे एकूण 30 हजार बेडस सज्ज आहे. लक्षणे विरहीत रुग्णांसाठी 40 हजार तर झोपड पट्टीत कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी 30 हजार असे 70 हजार बेडस तयार केले आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण बेडसची संख्या 1 लाखांवर गेली आहे. त्याचा लागेल तसा उपयोग केला जाणार आहे. औषधे आणि ऑक्सिजनचा पुरेसा साठा असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details