महाराष्ट्र

maharashtra

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या विरोधात बृजभूषण सिंह आणि शरद पवारांची युती.. संदीप देशपांडेंचा आरोप

By

Published : May 24, 2022, 11:06 AM IST

Updated : May 24, 2022, 12:03 PM IST

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी पुण्यातील सभेत त्यांच्या अयोध्या दौऱ्याला ( Raj Thackeray Ayodhya Visit ) विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवल्याचा आरोप केला होता. याबाबत मनसे नेत्यांनी राज ठाकरेंना विरोध करणारे खासदार बृजभूषण सिंह आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा फोटो ट्विट केला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) यांनी बृजभूषण सिंह आणि शरद पवार ( MP Brijbhushan Singh Sharad Pawar ) यांची युती असल्याचा आरोप केला आहे.

Brijbhushan Singh Sharad Pawar
बृजभूषण सिंह शरद पवार

मुंबई :राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांनी पुण्यातील सभेत त्यांच्या अयोध्या दौऱ्याला ( Raj Thackeray Ayodhya Visit ) विरोध करण्यामागे महाराष्ट्रातील काहींचा सहभाग असल्याचा आरोप केला होता. त्यावर आता मनसे नेत्यांकडून राज ठाकरेंना विरोध करणारे खासदार बृजभूषण आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ( MP Brijbhushan Singh Sharad Pawar ) यांचा फोटो ट्विट करण्यात आला आहे. तेल लावलेले पैलवान आणि गुडघ्यात अक्कल असलेले पैलवान यांची राजसाहेबांच्या विरोधात झालेली युती स्पष्ट दिसत आहे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे ( MNS Leader Sandeep Deshpande ) यांनी पवारांवर निशाणा साधला आहे.

राज ठाकरे यांनी त्यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेल्याचा आरोप पुण्यातील सभेत केला. तसेच राज ठाकरे यांनी तूर्तास अयोध्य दौरा स्थगित करत असल्याचंही सांगितलं. त्यामुळे राज ठाकरेंचा रोख नेमका कोणाकडे होता याची चर्चा रंगली होती. त्यातच आता मनसेकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर करण्यात आले आहेत.

यापूर्वीही झाला होता आरोप :यापूर्वी मनसे नेते प्रकाश महाजन यांनी शरद पवारांनीच राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला रसद पुरवल्याचा आरोप केला होता. आता मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोत बृजभूषण सिंह यांच्यासोबत शरद पवार आणि सुप्रिया सुळेही आहेत. त्यामुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावरून मनसे - राष्ट्रवादीत शाब्दिक वार तीव्र होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Raj Thackeray On Ayodhya Visit : 'माझ्या अयोध्या दौऱ्याचा विरोध हा एक सापळा होता, माझे कार्यकर्ते मी हकनाक घालवणार नाही'

Last Updated : May 24, 2022, 12:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details