महाराष्ट्र

maharashtra

शिखर बँकेच्या कथित घोटाळा प्रकरणात ईडीने पवार कुटुंबीयांची चौकशी करावी - किरीट सोमय्या

By

Published : Jul 2, 2021, 12:11 PM IST

Updated : Jul 2, 2021, 12:46 PM IST

किरीट सोमय्या यानी कन्नड साखर कारखान्या खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या गैरव्यवहाराचाी ई़डी मार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. गुरुवारी (1 जुलै) ईडीकडून सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. राज्य सहकारी बँकेचे संचालक अजित पवार असताना हा कारखाना कमी किमतीत लिलावात काढून त्याची विक्री केल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर आहे.

किरीट सोमय्या
किरीट सोमय्या

मुंबई- कन्नड साखर कारखाना ही शंभर कोटींची मालमत्ता असताना अजित पवार यांनी आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून हा कारखाना केवळ पन्नास कोटी मध्ये खरेदी केला. हा कारखाना रोहित पवार यांच्या मालकीचा आहे. या गैरव्यवहारात महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे नुकसान झाले आहे. या घोटाळ्यात पवार कुटुंबीयांची तातडीने ईडी (प्रवर्तन निदेशालाय) ने चौकशी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

पवार कुटुंबीयांची चौकशी करावी - किरीट सोमय्या
जरंडेश्वर साखर कारखाना जप्तीची कारवाईगुरुवारी (1 जुलै) ईडीकडून सातारा जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्याचे काम अजित पवार यांचे मामा राजेंद्र कुमार घाडगे पाहतात. राज्य सहकारी बँकेचे संचालक अजित पवार असताना हा कारखाना कमी किमतीत लिलावात काढून त्याची विक्री केल्याचा आरोप अजित पवार यांच्यावर आहे. साखर कारखान्याच्या माजी संचालिका शालिनीताई पाटील यांनी हा आरोप अजित पवार यांच्यावर लावलेला आहे. या प्रकरणात पोलीस योग्य तपास करत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. मात्र आता हा कारखाना ईडीकडून जप्त केल्याने अजित पवार यांना झटका दिला गेल्याची चर्चा आहे. राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी 65 जणांना क्लीनचिटराज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी 65 जणांना क्लीनचिट देण्यात आली होती. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे देखील नाव होते. राज्य सहकारी बँक कथित घोटाळा प्रकरणी चौकशी करण्यासाठी माजी न्यायमूर्ती पंडितराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीने 2020 च्या फेब्रुवारी महिन्यात या कथित घोटाळ्याप्रकरणी 65 जणांना क्लीनचिट दिली. त्यात अजित पवार आणि हसन मुश्रीफ यांना देखील क्लीन चिट देण्यात आली होती. मात्र आता ईडीकडून पुन्हा एकदा याबाबत कारवाई सुरू झाल्याने अजित पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

आता या प्रकरणानंतर भाजपानेते किरीट सोमय्या यांनी कन्नड साखर कारखाना खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. तसेच या गैरव्यवहाराचाी ई़डीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात केली आहे.

Last Updated :Jul 2, 2021, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details