महाराष्ट्र

maharashtra

समाजहिताच्या कामांमध्ये अशोक चव्हाण यांनी राजकारण करू नये - चंद्रकांत पाटील

By

Published : Mar 27, 2021, 6:46 PM IST

Updated : Mar 27, 2021, 7:04 PM IST

मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे समाजकारणा पेक्षा जास्त राजकारण करतात त्यामुळे माझ आवाहन आहे की त्यांनी राजकारण न करता समाज हित जोपासावे. त्यामुळे आपल्याला आरक्षण लवकरात लवकर मिळेल, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना लगावला.

chandrakant patil
chandrakant patil

मुंबई -भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप प्रदेश कार्यालयांमध्ये एक पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षण, महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रश्मी शुक्ला यांच्यावर होणारे आरोप या सगळ्या प्रश्नांवर उत्तरे देत महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये होत आहे. त्याचा निकाल हा आरक्षणाच्या बाजूने यावा, यासाठी प्रार्थना देखील चंद्रकांत पाटील यांनी केली, अशी माहिती त्यांनी दिली.

न्यायालयात बाजू मांडण्यात राज्य सरकार कमजोर -


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावरून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयामध्ये रोज या संदर्भातली सुनावणी होत आहे. परंतु सरकार या सुनावणीच्या दरम्यान उदासीन आहे का, असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. मागासवर्गीय आयोगाचा रिपोर्ट योग्य पद्धतीने सुप्रीम कोर्टात मांडलेला नसल्यामुळे मराठा आरक्षणाच्या सुनावणीदरम्यान अडथळा होत आहे. सरकार आपली बाजू मांडण्यासाठी कुठेतरी कमजोर पडत आहे, असंच काहीसं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे सरकार आरक्षण कितपत टिकवणार, याकडे आता सगळ्यांची नजर आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील

चव्हाण यांनी राजकारण न करता समाजहित जोपासावे -


सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकावे अशी माझी देखील इच्छा आहे. आमच्या सरकारच्या काळामध्ये आम्ही शैक्षणिक आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठा आरक्षण हे टिकवलं होतं आणि योग्य पद्धतीने आम्ही आमची बाजू उच्च न्यायालयात मांडलेली होती. त्यामुळे मराठा आरक्षणाला स्थगिती न मिळता मराठा आरक्षण हे टिकलेल होतं. परंतु हे सरकार आल्यानंतर या सरकारने व्यवस्थित बाजू मांडायची होती. योग्य बाजू मांडली नसल्यामुळे मराठा आरक्षण हे सुप्रीम कोर्टात टिकत नाही. वारंवार सरकार आपली बाजू मांडण्यासाठी विफल होत आहे. त्यातच मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे समाजकारणा पेक्षा जास्त राजकारण करतात त्यामुळे माझ आवाहन आहे की त्यांनी राजकारण न करता समाज हित जोपासावे. त्यामुळे आपल्याला आरक्षण लवकरात लवकर मिळेल. असा टोलाही त्यांनी मंत्री अशोक चव्हाण यांना लगावला.

Last Updated : Mar 27, 2021, 7:04 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details