महाराष्ट्र

maharashtra

डिझेल-पेट्रोलचे दर वाढल्याने नागरिक त्रस्त, गाडी विकून टाकावी वाटत असल्याची प्रतिक्रिया

By

Published : Oct 20, 2021, 1:11 PM IST

Updated : Oct 20, 2021, 2:33 PM IST

फाईल फोटो

रोज नव्याने डिझेलसह पेट्रोल, गॅसचे भाव वाढत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ केली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात इंधन दर 4.50 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये 106. 19 पैसे तर डिझेलचा दर 94.92 पैसे इतका झाला आहे. पेट्रोलच्या मागोमाग आता डिझेलनेही मुंबईमध्ये शंभरी ओलांडली आहे. मुंबईत डिझेलने शंभरी ओलांडली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 112. 11 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर, डिझेलचा दर 102. 89 रुपये इतका झाला आहे.

मुंबई -पेट्रोल आणि डिझेलच्या भाव वाढीने सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली आहे. रोज नव्याने डिझेलसह पेट्रोल, गॅसचे भाव वाढत आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ केली आहे. केवळ ऑक्टोबर महिन्यात इंधन दर 4.50 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. यामुळे पेट्रोलचे दर दिल्लीमध्ये 106. 19 पैसे तर डिझेलचा दर 94.92 पैसे इतका झाला आहे. पेट्रोलच्या मागोमाग आता डिझेलनेही मुंबईमध्ये शंभरी ओलांडली आहे. मुंबईत डिझेलने शंभरी ओलांडली आहे. सध्या मुंबईत पेट्रोल 112. 11 रुपये प्रति लिटर दराने विक्री होत आहे. तर, डिझेलचा दर 102. 89 रुपये इतका झाला आहे.

पेट्रोलचे दर वाढतच आहेत

ऑक्टोबर महिन्याचा विचार केला तर इंधनाचे दर 14 वेळा वाढवण्यात आले आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 4.50 रुपयांनी महाग झाले आहे. तर, डिझेल 4.70 रुपयांनी वाढले आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलचे दर यामुळे सर्वसामान्य त्रस्त झाला आहे. गेल्या दोन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात खूप मोठी वाढ झालेली आहे. विरोधकांनीही हा विषय धरून ठेवला होता. मात्र, त्याचा काहीही फायदा झाल्याचे दिसत नाही. पेट्रोलचे दर वाढतच आहेत. यामुळे दुचाकी आणि चारचाकीवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांनी काय करायचे असा प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे.

बाईक विकून टाकावी वाटते

मी एका खाजगी कंपनीत कामाला आहे माझा एक डोस झाल्यामुळे मला रेल्वेतून प्रवास करता येत नाही. यामुळे मला माझ्या दुचाकीचा वापर करावा लागतो. मात्र, पेट्रोलचे दर एवढे वाढल्यामुळे आता काय करायचे असा प्रश्न माझ्यासमोर पडला आहे. कधीकधी वाटते बाईक विकून टाकावी अशी खंत अनिरुद्ध साळवे यांनी व्यक्त केली आहे.

चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर

  • दिल्ली पेट्रोल 106. 19 रुपये आणि डिझेल 94.92 रुपये प्रति लीटर
  • मुंबई पेट्रोल 112. 11 रुपये आणि डिझेल 102. 89 रुपये प्रति लीटर
  • चेन्नई पेट्रोल 103.31 रुपये आणि डिझेल 99.26 रुपये प्रति लीटर
  • कोलकाता पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 98.03 रुपये प्रति लीटर

कोणत्या राज्यात 100 पार

या राज्यांत 100 रुपयांपार पेट्रोल महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान तेलंगणा आंध्र प्रदेश ओडिसा कर्नाटक लडाख जम्मू काश्मीर या भागामध्ये पेट्रोल ने शंभरी पार केली आहे. सगळ्यात जास्त दर हे मुंबईमध्ये आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने लागू केलेल्या कर आणि वाहतुकीच्या खर्चामुळे विविध राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीतील फरक असतो.

हेही वाचा -ग्रामीण भागातील सुरेल आम्रपालीची 'इंडियन आयडॉल'च्या अंतिम प्रवेश फेरीत धडक

Last Updated :Oct 20, 2021, 2:33 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details