महाराष्ट्र

maharashtra

व्याघ्र संवर्धन प्रतिष्ठान नियामक मंडळाच्या 2021-22 च्या अर्थसंकल्पाला मंजूरी

By

Published : Oct 22, 2021, 9:22 PM IST

व्याघ्र संवर्धन नियामक मंडळाच्या सन 2021-22 वर्षाच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वाघ आणि अन्य वन्यजीवांसह संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

Tiger Conservation Foundation Regulatory Board's budget for 2021-22
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई - व्याघ्र संवर्धन नियामक मंडळाच्या सन 2021-22 वर्षाच्या अर्थसंकल्पाला आज मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. राज्यातील व्याघ्र प्रकल्प क्षेत्रांचे व्यवस्थापन तसेच वाघ आणि अन्य वन्यजीवांसह संपूर्ण जैवविविधतेचे संवर्धन करताना स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध विभागांच्या योजनांची सांगड घालावी, असे निर्देश मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी दिले.

पर्यावरण व पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, गृह व वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष जयस्वाल, मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक जी. साईप्रकाश, प्रधान मुख्य वन संरक्षक सुनील लिमये, विविध व्याघ्र प्रकल्पांचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक तसेच मदत पुनवर्सन मंत्री विजय वडेट्टीवार, वन्यजीव मंडळाचे सदस्य, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, मानद वन्यजीव रक्षक आदी दूरदृश्य माध्यमातून उपस्थित होते.

हेही वाचा : Special Story : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प सुरू; पहिल्याच दिवशी पर्यटकांची जंगल सफारी

स्थानिकांना मिळणार रोजगार

राज्यातील व्याघ्र प्रकल्पातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील चुकीच्या पद्धतीने बांधलेल्या रस्ता दुभाजकामुळे वाघांसह, वन्यजीव अपघातात बळी पडत आहेत, हे टाळण्यासाठी केंद्राच्या संबंधित यंत्रणेला तात्काळ कळविण्यात यावे. याचा पाठपुरावा करून वन विभागाने वाघांचा मार्ग मोकळा करावा. रेल्वे मार्गामुळे होणारे अपघात टाळण्यासाठीही प्रयत्न करावे. जंगलावर अवलंबून असणाऱ्यांना, वनक्षेत्र लगतच्या परिसरातील स्थानिकांना विविध विभागांच्या योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करुन द्यावे. पर्यटनाला चालना देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांची कामे दर्जेदार करण्यात यावीत, अशा सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिल्या. तसेच लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करावा, असे निर्देश दिले.

हेही वाचा : Pench Tiger Reserve : वाघिणीची हरिणाच्या कळपावर झडप; पाहा व्हिडीओ

विकासकामांवर भर द्या

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नवेगाव -नागझिरा, ताडोबा-अंधारी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पेंच-बोर व्याघ्र प्रकल्पांच्या संचालकांनी प्रकल्पांच्या वाटचालीचा आढावा तसेच आर्थिक बाबींची माहिती सादर केली. प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत असलेल्या स्थानिकांसाठीच्या योजना त्यामध्ये रोजगार संधी, पर्यटन सुविधा, जाणीव जागृती, निसर्ग शिक्षण तसेच पायाभूत विकास कामे, नाविन्यपूर्ण उपक्रम आदींची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच ताडोबा पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले

ABOUT THE AUTHOR

...view details