महाराष्ट्र

maharashtra

Anil Parab on ST Strike : 22 एप्रिलपर्यंत रुजू न होणाऱ्या एसटी कामगारांवर कारवाई अटळ - अनिल परब यांचा इशारा

By

Published : Apr 7, 2022, 5:00 PM IST

बई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( State Transport Minister Anil Parab ) यांनी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची अथवा बडतर्फीची कारवाई ( ST Employees strike ) केली जाईल, असे म्हटले आहे. २२ एप्रिलनंतर कोणालाही संधी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी ( Anil Parabs final warning ) दिला. तसेच 22 एप्रिलनंतर नवीन कर्मचारी भरती केली ( ST employees recruitment ) जाईल असेही त्यांनी सांगितले.

परिवहन मंत्री अनिल परब
परिवहन मंत्री अनिल परब

मुंबई- एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप संपवून 22 एप्रिल पर्यंत कामावर हजर व्हावे. त्यानंतर कारवाई अटळ आहे. मग कोणालाही संधी दिली जाणार नाही, असा थेट इशारा परिवहन मंत्री अनिल परब ( Anil Parab on ST strike ) यांनी दिला आहे. कामावर हजर होणाऱ्या कामगारांना कोणतीही अडचण येऊ देऊ नये, अशी सूचना न्यायालयाने सरकारला केली आहे.

गेल्या पाच महिन्यांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप बंद करून ताबडतोब कामावर हजर व्हावे, अशी सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे.

22 एप्रिलनंतर नवीन कर्मचारी भरती -मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ( State Transport Minister Anil Parab ) यांनी गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची अथवा बडतर्फीची कारवाई ( ST Employees strike ) केली जाईल, असे म्हटले आहे. २२ एप्रिलनंतर कोणालाही संधी दिली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी ( Anil Parabs final warning ) दिला. तसेच 22 एप्रिलनंतर नवीन कर्मचारी भरती केली ( ST employees recruitment ) जाईल असेही त्यांनी सांगितले.

चुकीचा नेता निवडू नये-गेल्या पाच महिन्यांमध्ये कामगारांचे अतोनात नुकसान झाले आहे. यापुढेही त्यांनी चुकीचा नेता निवडून नुकसान करू नये. गुणरत्न सदावर्ते है कामगारांची दिशाभूल करत आहेत. त्यांच्या मागे लागू नये असेही यावेळी अनिल परब यांनी सांगितले. कामगारांची सर्व थकीत देणी आणि वेतन तसेच भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगारांना दिली जाईल. त्यामध्ये कोणताही अडथळा येणार नाही असेही त्यांनी सांगितले.

मुंबई उच्च न्यायालयाने हे दिले आदेश-मागील पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा तिढा अखेर सुटला आहे. एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai High Court ) दिला आहे. याशिवाय संपात सहभागी असणाऱ्या कर्मचाऱ्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करू नका. निवृत्ती वेतन ग्रॅज्युटी देण्याचे आदेशही मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी (दि. 7 एप्रिल) दिलेली आहे. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या आदेशानंतरच संप मागे घेऊ, अशी प्रतिक्रिया एसटी कर्मचाऱ्यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.

हेही वाचा-Contract Staff will appoint In MSRTC : एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दणका, 11 हजार कंत्राटी कर्मचारी भरण्याची परिवहनमंत्र्यांची घोषणा

हेही वाचा-एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यासाठी 22 एप्रिलपर्यंतची मुदत.. निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी देण्याचे राज्य सरकारला आदेश

हेही वाचा-उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातवरण; सदावर्ते यांचा आदेश आल्याशिवाय संप मागे नाही

ABOUT THE AUTHOR

...view details