महाराष्ट्र

maharashtra

Ae Watan Mere Watan : अमेझॉनची 'ए वतन मेरे वतन' साठी 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ऑफर, वरुण धवनने केला मोठा खुलासा!

By

Published : Oct 5, 2022, 4:43 PM IST

Ae Watan Mere Watan

प्राइम व्हिडिओचा आगामी अमेझॉन ओरिजिनल चित्रपट 'ए वतन मेरे वतन' (Amazon Original Movie Ae Watan Mere Watan) मध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत (star Sara Ali Khan in the lead role) दिसणार आहे. याची घोषणा वरुण धवनने (Varun Dhawan) प्राइम व्हिडिओच्या वतीने केली आहे.

मुंबई :प्राइम व्हिडिओचा आगामी अमेझॉन ओरिजिनल चित्रपट 'ए वतन मेरे वतन' (Amazon Original Movie Ae Watan Mere Watan) मध्ये सारा अली खान मुख्य भूमिकेत (star Sara Ali Khan in the lead role) दिसणार आहे. याची घोषणा वरुण धवनने (Varun Dhawan) प्राइम व्हिडिओच्या वतीने केली आहे.



चित्रीकरणाला सुरुवात : प्राईम व्हिडिओ ने चाहत्यांना आणि दर्शकांना आगामी प्रोजेक्ट्स, सुपर-फॅन आणि #PrimeBae अंतर्गत वरूण धवनच्या 'नेव्हर हर्ड बिफोर' अपडेटसह दिलेले वचन पूर्ण केले आहे. सारा अली खान आगामी अमेझॉन ओरिजीनल चित्रपट 'ए वतन मेरे वतन' मध्ये दिसणार आहे. याच महिन्यात या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.



थ्रिलर कथानक :वरुणने त्याच्या खास शैलीत खुलासा केला की, सारा अली खान १९४२ मधील भारत छोडो आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर तयार केलेल्या काल्पनिक कथेत एका शूर आणि निडर स्वातंत्र्यसैनिकाची भूमिका साकारणार आहे. खऱ्या घटनांनी प्रेरित असलेले कथानक थ्रिलर आहे. ए वतन मेरे वतन, ची संहिता दरब फारुकी आणि कन्नन अय्यर यांनी लिहिली आहे.


धर्माटिक एंटरटेनमेंट प्रॉडक्शनच्या या चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि अपूर्व मेहता करीत आहेत. सोमेन मिश्रा सह-निर्माता म्हणून काम करत आहेत. तर कन्नन अय्यर दिग्दर्शन करत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details