महाराष्ट्र

maharashtra

Aaditya Thackeray : बंडाळीनंतर आदित्य ठाकरे यांचे वजन वाढले, आणखी एका खात्याची जबाबदारी

By

Published : Jun 27, 2022, 6:04 PM IST

शिवसेनेतील बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Shivsena rebel leader Eknath Shinde ) यांनी मोठा गट फोडल्यानंतर महाराष्ट्रात वेगाने राजकीय घडामोडी होत आहेत. शिवसेनेतील बंडाळीनंतर सेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांचे पक्ष आणि सरकारमधील वजन वाढल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी मंत्रीमंडळात फेरबदल करीत सर्व बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेत त्यांचा पदभार अन्य मंत्र्यांकडे दिला आहे. या फेरबदलात मुख्यमंत्र्यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांच्याकडे आणखी एक महत्त्वाचे खाते देण्यात आले आहे.

Aditya Thackeray
Aditya Thackeray

मुंबई -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या विरोधात एकनाथ शिंदे ( Shivsena rebel leader Eknath Shinde ) यांनी मोठी बंडखोरी केल्यानंतर राज्यात अस्थिरता निर्माण झाल्याची स्थिती आहे. मात्र, जनतेची कामे अडून राहू नयेत म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांनी आपल्या मंत्रीमंडळात फेरबदल केले आहेत. बंडखोरांना मंत्री पदावरून बाजुला करीत त्यांच्याकडील खाती मंत्रालयातील अन्य मंत्र्यांकडे दिली आहेत. या फेरबदलात आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांना झुकते माप मिळाले आहे. दोन दिवसांपूर्वीच शिंदे गटाला जाऊन मिळालेले मंत्री उदय सामंत यांच्याकडील खाते आदित्य यांच्याकडे देण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्याकडे यापूर्वीच पर्यटन आणि पर्यावरण मंत्रालयाचा कारभार आहे. आता त्यांच्याकडे उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खात्याचाही कारभार देण्यात आला आहे.

एकनाथ शिंदेंचे खाते सुभाष देसाईंकडे -एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे, गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे, दादाजी दगडू भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान आसाराम भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे देण्यात आले आहे.

राज्य मंत्र्याकडील खातेवाटपात बदल - शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती (कंसात) संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.), राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग), सतेज उर्फ बंटी पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू, राज्यमंत्री यांच्याकडील खाती (कंसात) आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) यांच्याकडे देण्यात आले आहे.

हेही वाचा -Maharashtra Political Crisis : बंडखोरांना दिलासा, सर्वोच्च न्यायालयाची नरहरी झिरवळांना नोटीस

ABOUT THE AUTHOR

...view details