महाराष्ट्र

maharashtra

Loudspeaker Row : १३५ मशिदींवर राज्य सरकार काय कारवाई करणार? राज ठाकरेंचा सवाल

By

Published : May 4, 2022, 6:51 AM IST

Updated : May 4, 2022, 10:42 PM IST

मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आजपासून मनसेचे आंदोलन, पहा क्षणाक्षणाची अपडेट
Loudspeaker Row LIVE Updates

18:30 May 04

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घराबाहेर सकाळी संदीप देशपांडे यांच्या मुळे घडलेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हे शाखेच्यावतीने घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. तसेच संदीप देशपांडे यांचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. पोलिसांच्या क्राईम ब्रँचसह सर्व युनिट देशपांडेंचा शोध घेत आहेत. पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेजसह माध्यमांच्या व्हिडीओ देखील तपासल्या जात आहे. सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत देशपांडेवर करावाई होण्याची शक्यता आहे.

16:33 May 04

पुण्यात मनसेकडून महाआरती

पुणे -राज ठाकरे यांच्या आवहानानंतर आज मनसैनिक राज्यभर महाआरती करणार आहेत. त्याचबरोबर जर आज मशिदिवरचे भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदी बाहेर हनुमान चालीसा लावा, असं आवाहन देखील राज ठाकरे यांनी काल परिपत्रक काढत केलं होत. त्याच अनुषंगाने राज्यातील विविध भागात मनसैनिकांनी हनुमान चालिसा पठण केलं आहे. मात्र, पुण्यात अजूनपर्यंत तरी कुठच हनुमान चालीसा लावण्यात आली नाही. याउलट पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदीरात ज्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते पहिल्यांदा महाआरती करण्यात आली होती त्याचठिकाणी आज मनसे कार्यकर्त्यांकडून महाआरती पार पडली. या सगळ्या पार्शवभूमीवर पुणे पोलीसांनी मोठा फौजफाटा तैनात केला होता. ही आरती पार पडताच कारवाई करत मनसे पदाधिकाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतल आहे. त्या सगळ्यांना फरासखाना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे.

15:10 May 04

नाशिकमध्ये मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना अटक

नाशिक -भद्रकाली भागात हनुमान चालीसाचा पठण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या मनसेच्या 6 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी महेंद्र चौहान यांनी दिली.

14:51 May 04

लोकल ट्रेनमध्येही हनुमान चालिसाचे पठण

आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण केले जात आहे. साधारणपणे मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवासी भजन आणि कीर्तन करत राहतात. मात्र, आज लोकल ट्रेनमध्येही प्रवाशांनी हनुमान चालिसाचे पठण केले.

13:08 May 04

..तर मंदिरांवरचे भोंगेही खाली उतरले पाहिजेत

  • मशिदीवरील भोंग्यांचा फक्त विषय नाही. मंदिरांवरचे भोंगेही खाली उतरले पाहिजेत.
  • लोकवस्तीत ४५ ते ५० डेसिबल स्पीकर वाजवू शकता.
  • मशिदींना ३६५ दिवसांची परवानगी तुम्ही कशी देऊ शकता. राज ठाकरेंचा सवाल

13:03 May 04

१३५ मशिदींवर राज्य सरकार काय कारवाई करणार?

  • सकाळपासून फोन येत आहेत.
  • नेत्यांना फोन येताहेत.
  • राज्याच्या बाहेरूनही फोन येताहेत.
  • पोलिसांकडूनही फोन येताहेत.
  • अनेक ठिकाणी पदाधिकारी, मनसैनिकांना नोटिसा, ताब्यात घेतले.
  • ही गोष्ट आमच्या बाबतीत का होतेय?
  • जे कायद्याचं पालन करताहेत. त्यांना तुम्ही सजा देणार.
  • ९० ते ९२ टक्के सकाळची अजान झाली नाही.
  • मौलवींचे आभार मानेन. त्यांना आमचा मेसेज नीट समजला.
  • मुंबईच्या रिपोर्टप्रमाणे ११४० मशिदी. १३५ मशिदीवर सकाळची अजान ५ वाजायच्या आत लावली गेली.
  • मग १३५ मशिदींवर राज्य सरकार काय कारवाई करणार?

12:56 May 04

  • मशिदीसमोर हनुमान चालीसा.. राज ठाकरे काय बोलणार? पत्रकार परिषद

12:48 May 04

पुण्यात मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांच्यासह कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

  • खालकर हनुमान मंदिरात महाआरती केल्यानंतर पुणे पोलिसांनी मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांच्यासह अन्य 6 जणांना ताब्यात घेतले. प्रतिबंधात्मक कारवाईनुसार त्यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.

12:47 May 04

मनसेचे अडीचशे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात, पोलिसांची माहिती

  • लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवल्याबद्दल राज्यभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 250 हून अधिक कार्यकर्त्यांना अद्याप ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

12:29 May 04

१३५ मशिदींवर योग्य ती कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र गृह विभागाने दिले

  • मुंबईत एकूण 1,140 मशिदी आहेत. ज्यापैकी 135 मशिदी आज सकाळी 6 च्या आधी लाऊडस्पीकर वापरतात. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध गेलेल्या या १३५ मशिदींवर योग्य ती कारवाई करावी असे आदेश महाराष्ट्र गृह विभागाने दिलेत.

12:20 May 04

  • मनसे आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर पुण्यात परिस्थिती नियंत्रणात, पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती

11:43 May 04

संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला

  • राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थाच्या समोर मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. यावेळी झटापट होऊन देशपांडे व धुरी हे दोघे चारचाकी गाडीतून निघून गेले. यावेळी झटापट होताना महिला पोलिसाला धक्का लागून त्या खाली पडल्या. यावेळी त्या जखमी झाल्याचे समजते. देशपांडे यांना ताब्यात घेण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरु केले आहेत.

11:42 May 04

मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पत्रकार परिषद

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेणार पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती मनसे नेते सचिन मोरे यांनी दिली.

11:39 May 04

सानपाडा पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष योगेश शेटे लाऊडस्पीकरच्या वादातून ताब्यात

  • नवी मुंबईतील सानपाडा पोलिसांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) शहराध्यक्ष योगेश शेटे यांना लाऊडस्पीकरच्या वादातून ताब्यात घेतले.

11:35 May 04

नंदुरबार - पोलिसांनी 17 कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत बजावल्या नोटीस

  • मनसेच्या भोंगे आंदोलनाचे लोन ग्रामीण भागात पोहचले
  • मनसेचे कार्यकर्ते आज करणार हनुमान चालीसा आंदोलन
  • पोलीसांनी 17 कार्यकर्त्यांना 149 अंतर्गत बजावल्या नोटीस
  • परिस्थीतीवर पोलिसांची करडी नजर
  • - शहरी भागात तणावपूर्ण वातावरण, पोलिसांचा चोख बंदोबस्त

10:03 May 04

  • सच्चे मु्स्लीम भारतविरोधी कृत्य करणार नाहीत - नितेश राणे

09:46 May 04

जालना - मनसे कार्यकर्त्यांकडून श्रीराम मंदीरात श्री राम आरती करून हनुमान चालीसा पठण

जालना: राज ठाकरे यांनी, भोंगे बंद न झाल्यास मशीदीवरील भोंग्याच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत मनसेच्या विद्यार्थी सेनाकडून मंठा तालुक्यातील जयपूर काकडे या गावात श्रीराम मंदीरात श्री राम आरती करून हनुमान चालीसा पठण करण्यात आले. मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या सिद्धेस्वर काकडे यांनी कार्यकर्त्यांसह मंदिरात हनुमानाची चालीसा लाऊन हनुमानाची आरती ही केलीय. कालच सेवली पोलिसांनी सिद्धेस्वर काकडे या कारकर्त्याला 149 अन्वेय नोटीस बजावली होती.

09:22 May 04

जळगाव जामोद येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाजवला मशिदीसमोर हनुमान चालीसा

बुलडाणा - जळगाव जामोद येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाजवला मशिदीसमोर हनुमान चालीसा, मनसे आक्रमक, परिसरात तणावपूर्ण शांतता

08:52 May 04

पोलीस परवानगी घेऊनच आंदोलन करण्याची भूमिका नागपूर मनसेने घेतली

नागपूर - राज ठाकरे ह्यांनी कायदा व सुव्यवस्था राखून आंदोलन करा असे सांगत आम्ही पोलीस परवानगी घेऊनच आंदोलन करण्याची भूमिका नागपूर मनसेने घेतली आहे. 32 ठिकाणी हनुमान चालीसा पठणाची परवानगी मागितली असून अजून एक ही परवानगी मिळाली नाही. तेच मनसेच्या प्रमुख 15 ते 20 पदाधिकारी यांना नोटीसी बजावण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

08:32 May 04

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष साळवी यांना भिवंडीतील नारपोली पोलिसांनी अटक

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष संतोष साळवी यांना भिवंडीतील नारपोली पोलिसांनी अटक केलीे.

मुरबाडमध्ये नियम तसेच परवानगीनुसारच मशिदीमध्ये अजान होणार, निवेदनाद्वारे केले स्पष्ट

08:16 May 04

ऐरोलीत मनसेचे ३ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

ऐरोलीत मनसेचे ३ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

ऐरोली नवी मुंबईतील मशिदीबाहेर हनुमान चालीसा वाचण्यासाठी जमलेल्या नवी मुंबई मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
मनसेचे ३ कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

07:57 May 04

मुंबई पोलीस आयुक्तांची शहरभर फिरून कायदा सुव्यवस्थेची पाहणी

पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी धारावी परिसराला भेट देऊन पाहणा केली. ते शहरातील विविध भागाची पाहणी करणार आहेत.

07:55 May 04

नाशिक - पोलिसांकडून 14 मनसैनिकांना तडीपारीची नोटीसा,29 मनसैनिक ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानंतर नाशिकमध्ये मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून मशिदी समोर हनुमान चालीसा पठण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु पोलिसांनी वेळीच या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यावेळी मनसे पदाधिकारी आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. पोलिसांनी केलेल्या कारवाई विरोधात मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता.

07:22 May 04

जळगावातील हनुमान मंदिरावर मनसे कार्यकर्त्यांनी लावले भोंगे

07:12 May 04

मनसेकडून मुंब्रामध्ये नमाजवेळी झाले हनुमान चालीसाचे पठण

मनसेकडून मुंब्रामध्ये नमाजवेळी झाले हनुमान चालीसाचे पठण

मनसेचे कार्यकर्ते ज्यावेळी नमाज सुरू होती त्यावेळी भोंग्यावर सुरू केले नमाज पठण

ठाणे पोलिस करू शकतात मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई होऊ शकतो गुन्हा दाखल

07:05 May 04

मुंबईतील चारकोप परिसरात अजानच्यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा

मुंबईतील चारकोप परिसरात अजानच्यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा लावला

कांदिवली -
मुंबईतील चारकोप परिसरात अजानच्यावेळी काही मनसे कार्यकर्त्यांनी इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा लावला
मुंबईच्या कांदिवली पश्चिम चारकोप विधानसभेच्या संजय नगरमध्ये अजानच्या वेळी मनसेने हनुमान चालिसाचे पठण केले.

06:26 May 04

Loudspeaker Row : मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांविरोधात आजपासून मनसेचे आंदोलन, पहा क्षणाक्षणाची अपडेट

मुंबई : राज्यभरातील मशिदींवर लावण्यात आलेल्या अनधिकृत भोंग्यांच्या विरोधात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आजपासून आंदोलनाची घोषणा केली आहे. त्यानुसार अनधिकृत भोंगे वाजविणाऱ्या मशिदींसमोर हनुमान चालीसा दुप्पट आवाजात लावण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले आहे. राज यांच्या आवाहनानंतर होणारी संभाव्य परिस्थिती लक्षात घेता पोलिसही राज्यभरात सतर्क झाले असून, अनेक ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

कार्यकर्त्यांना पोलिसांनी बजावल्या नोटिसा :औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा पार पडल्यानंतर काल ( दि. ३ ) पोलिसांनी राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांना नोटीसा बजावल्या आहेत. राज ठाकरे यांनी या सभेमध्ये 4 मे नंतर राज्यात मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. त्यामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून हिंदू संघटनांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांनाही नोटीस बजावली आहे.

कार्यकर्त्यांना मुंबई सोडण्याचे आदेश - दरम्यान राज ठाकरे यांनी राज्यातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला दिलेल्या अल्टिमेटमची मुदत मंगळवारी संपुष्टात आली. ही मुदत संपूनही अद्याप कोणत्याही मशिदीवरील भोंगे उतरवण्यात आलेले नाहीत. त्यामुळे राज ठाकरे यांच्या इशाऱ्याप्रमाणे मनसैनिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भोंगा प्रकरणी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी मनसेसोबतच बजरंग दल, विश्व हिंदू परीषद आणि हिंदू दलाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत. या सर्वांना 2 मे ते 17 मे या काळात मुंबई सोडण्याचे आदेश जारी केले गेले आहेत.

मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्ट :राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती दिली. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व उपाययोजना कराव्यात आणि कोणाच्या आदेशाची वाट पाहू नये, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्राचे डीजीपी आणि मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून संभाषण केले, कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चर्चा झाली.

Last Updated :May 4, 2022, 10:42 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details