महाराष्ट्र

maharashtra

अभिनेत्री अनन्या पांडे आज एनसीबी कार्यालयात चौकशीला गैरहजर

By

Published : Oct 25, 2021, 4:39 PM IST

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिची एनसीबीकडून जवळपास अडीच तास चौकशी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवस चौकशी केली होती. पण, अनन्याच्या चौकशीत पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे, तिला आज पुन्हा सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, आज अनन्या चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आली नाही.

Actress Ananya Pandey inquiry NCB
अभिनेत्री अनन्या पांडे एनसीबी कार्यालय गैरहजर

मुंबई - बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे यांची मुलगी अनन्या पांडे हिची एनसीबीकडून जवळपास अडीच तास चौकशी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी स्वत: एका महिला अधिकाऱ्यासोबत अनन्याची गुरुवार आणि शुक्रवार या दोन दिवस चौकशी केली होती. पण, अनन्याच्या चौकशीत पुरेशी माहिती मिळालेली नाही. त्यामुळे, तिला आज पुन्हा सकाळी 11 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, आज अनन्या चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात आली नाही.

हेही वाचा -विनामास्क फिरणाऱ्या मुंबईकरांकडून ७७ कोटींचा दंड वसूल

नेमकं प्रकरण काय?

मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी 2 ऑक्टोबर रोजी कॉर्डेलिया जहाजावर धाड टाकली होती. यावेळी जहाजावर रेव्ह पार्टी सुरू असल्याचे उघडकीस आले होते. या ठिकाणाहून अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेण्यात आले होते. आर्यन खान हा सध्या जेलमध्ये आहे. मात्र, त्याच्या चौकशीतून अनेक गोष्टींचा उलगडा झाला आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनचे व्हॉट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. यात अनेक प्रसिद्ध व्यक्तींचा समावेश आहे. यात अभिनेत्री अनन्या पांडे हिचेदेखील नाव आहे. आर्यन खान आणि अनन्या यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचे एनसीबी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोघांतील व्हॉट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टात सादर केला होता. त्यामुळे, आर्यनला जामीन मिळण्यास अडचण झाली.

एनसीबी अधिकारी अनन्याच्या घरी धडकले

आता आर्यनने हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एनसीबी पुन्हा सक्रिय झाली आहे. अनन्या पांडे हिचा जबाब आर्यनला जामीन मिळवण्यासाठी अडचणीचा ठरू शकतो. एनसीबीचे अधिकारी 21 ऑक्टोबर रोजी सकाळी अनन्या पांडे हिच्या घरी धडकले होते. त्यांनी तिच्या घराची झडती घेतली. यावेळी एनसीबी अधिकाऱ्यांनी अनन्या हिचा मोबाईल आणि लॅपटॉप ताब्यात घेतला. यानंतर तिला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत समन्स बजावले. तिला दुपारी 2 वाजता एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याबाबतचे समन्स होते. मात्र, ती 4 वाजता एनसीबी कार्यलयात हजर झाली. तिची जवळपास अडीच तास चौकशी झाली होती

एनसीबीच्या चौकशीत अनन्याला काय-काय विचारण्यात आले?

समीर वानखेडे यांनी स्वत: अनन्याची चौकशी केली. यावेळी एक महिला अधिकारी देखील होत्या. त्यांनी अनन्याला तिच्या आर्यन सोबतच्या मैत्रीबाबत विचारले. तसेच, तिला ड्रग्स पेडलरबाबत विचारले. तिच्यात आणि आर्यन यांच्यात झालेले संवाद तिला दाखवण्यात आले. त्या चॅटबाबत तिला विचारण्यात आले.

हेही वाचा -समीर वानखडे तातडीने दिल्लीला जाणार; खंडणी प्रकरण संदर्भात दिल्लीत बोलवले

ABOUT THE AUTHOR

...view details