महाराष्ट्र

maharashtra

ST Workers Strike - संपातील एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई होणार?

By

Published : Dec 3, 2021, 1:00 PM IST

Updated : Dec 3, 2021, 1:35 PM IST

एसटी कर्मचाऱ्यांवर परिवहन मंडळाने ( ST Transport Corporation Maharashta )कारवाईचा बडगा उगारला आहे. ( ST Workers Strike ) मात्र, संपकरी काही सेवेत रुजू होत नाहीत. (Maharashtra Essential Services Act ) आता महामंडळाकडून या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. (Maharashtra Government warns striker staff mesma) आज मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात दुपारी साडे बारा वाजता परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत मेस्मा कायदा लावण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

ST Workers Strike - संपातील एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई होणार?
ST Workers Strike - संपातील एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा कायद्या अंतर्गत कारवाई होणार?

मुंबई - विलीनीकरणाच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर परिवहन मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. (Maharashtra ST workers strike ) मात्र, संपकरी काही सेवेत रुजू होत नाहीत. ( Action ST Employees Mesma Act ) आता महामंडळाकडून या कर्मचाऱ्यांवर मेस्माअंतर्गत कारवाई करण्याच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान, संप गुंडाळणार की कारवाईचा सामना करणार, हे पाहावे लागणार आहे. (Maharashtra Government warns striker staff mesma) आज मुंबई सेंट्रलच्या एसटी मुख्यालयात दुपारी साडे बारा वाजता परिवहन मंत्री अनिल परब आणि एसटी अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीत मेस्मा कायदा लावण्याबाबत चर्चा केली जाणार आहे.

मेस्मा लावणार?

वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले. गेल्या महिनाभरापासून आझाद मैदानात ठाण मांडले आहे. ( ST Workers Strike) विलीनीकरणाची आग्रही मागणी कर्मचाऱ्यांनी लावून धरली आहे. (Maharashtra Government warns striker staff mesma) सरकारने संप मोडीत निघावा, यासाठी घसघशीत वेतनवाढ दिली. तरीही कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. न्यायालयाने संबंधित मागणीसाठी तीन जणांची समिती नेमली आहे. १२ आठवड्यात समितीचा अहवाल येणार आहे. तोपर्यंत संप मागे घेण्यात यावा, असे राज्य परिवहन महामंडळाने सातत्याने करत आहे. ( ST Transport Corporation Maharashta ) परंतु, संपकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. आधीच राज्य परिवहन महामंडळाचा चाक आर्थिक खाईत रुतला आहे. अशा परिस्थिती प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरवल्यास मोठे नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर महामंडळ आता मेस्मा लावण्याच्या तयारीत आहेत.

दोन हजार कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

महामंडळाच्या आवाहनाला केराची टोपली दाखवणाऱ्या सुमारे नऊ हजार कर्मचाऱ्यांचे निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर, दोन हजार कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कारवाई करत घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. संप असाच सुरु ठेवला तर महामंडळ, कर्मचारी आणि प्रवाशांनाही परवडणार नाही. त्यामुळे आता कठोर कारवाई करणे योग्य ठरणार असल्याचे परिवहन महामंडळाचे म्हणणे आहे.

हेही वाचा -Cyclone Jawad Effect on Railway - चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर परिणाम, रेल्वेसेवा विस्कळीत

Last Updated :Dec 3, 2021, 1:35 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details