महाराष्ट्र

maharashtra

Byculla Fire Broke Out : भायखळ्यात अग्नितांडव : गोडाऊनला लागली भीषण आग, ४ तासांनी आगीवर नियंत्रण

By

Published : Jan 13, 2022, 1:40 AM IST

भायखळ्यात अग्नितांडव
भायखळ्यात अग्नितांडव ()

भायखळ्याच्या बुधवारी सांयकाळी अग्नितांडव पाहावयास मिळाले. येथील एका गोडाऊनला भीषण आग लागली ( Byculla Fire Broke Out ) होती. अग्निशमन दलाच्या जावांनी ४ तास परिश्रम घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

मुंबई - भायखळा येथील गर्दीचे ठिकाण असलेल्या मदनपुरा येथील गोडाऊनला बुधवारी सायंकाळी ७.३० च्या सुमारास आग ( Byculla Fire Broke Out ) लागली. या आगीवर तब्बल ४ तासांनी नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

गोडाऊन जळून वित्त हानी

भायखळा, मदनपुरा येथील तस्लिमा हाईट या बिल्डिंगच्या जवळ तळ मजला अधिक एक असे दुमजली लेदरचे गोडाऊन आहे. या गोडाऊनला बुधवारी सायंकाळी ७.३० वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामातील लेदरच्या साठ्यामुळे आग आणखीन भडकली. आग लागलेल्या गोडाऊनच्या बाजूला अनेक बैठी बांधकामे आहेत. आजूबाजूला आग पसरण्याची भीती असल्याने सायंकाळी ७.५० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाने आगीची लेव्हल २ ची झाल्याचे जाहीर केले.

४ तास झुंज

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांनी ८ फायर इंजिन, ५ जंबो वॉटर टँकर यांच्या सहाय्याने सदर आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. तब्बल ४ तास आगीशी झुंज दिल्यानंतर रात्री ११.१५ च्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला यश आले आहे. सुदैवाने या आगीमुळे कोणीही जखमी झालेले नाही. मात्र आगीमुळे गोडाऊन जळून मोठी वित्त हानी झाली. ही आग कोणत्या कारणामुळे लागली याची चौकशी स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाकडून केली जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details