महाराष्ट्र

maharashtra

तब्बल ७३ सेवा निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या थकीत रक्कम मिळण्यापूर्वीच मृत्यू

By

Published : Apr 26, 2022, 8:32 PM IST

राज्य परिवहन महामंडळाच्या दहा हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे ( ST Employees ) स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 295 कोटी रुपये देणे थकीत असून एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत आहे. आतापर्यत तब्बल 73 सेवा निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या थकीत रक्कम मिळण्यापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे..

एसटी
एसटी

मुंबई -संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा राज्य परिवहन महामंडळाच्या ( MSRTC ) दहा हजार निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले होते. गेल्या तीन वर्षांपासून पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना मुख्यालय, आगारात चकरा माराव्या लागत आहेत. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 295 कोटी रुपये देणे थकीत असून एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत आहे. आतापर्यत तब्बल 73 सेवा निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या थकीत रक्कम मिळण्यापूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

295 कोटी रुपये थकीत - एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जाते. मात्र, 1 जून, 2018 पासून राज्यभरातील सुमारे दहा निवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना पैसे अद्यापही महामंडळाकडून मिळालेले नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 295 कोटी रुपये देणे थकीत होते. अनेक कर्मचारी आपल्या हक्काचे पैसे मिळविण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुख्यालयात गेल्या दोन वर्षापासून चकरा मारत होते. मात्र, निवृत्तीनंतरची सर्व देणी तत्काळ देण्याचे परिपत्रक असतानाही निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांची कोणीही ऐकत नाही. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सुमारे 295 कोटी रुपये देणे थकीत असून एसटी महामंडळाकडे निधीची कमतरता असल्याचे कारण अधिकारी सांगत आहे.

300 कोटी रुपयांची तरतूद करवी -महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी सांगितले की, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही हे खरे असले तरी जे कर्मचारी सध्या कामावर आहेत. त्यांच्या वेतनासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात चार वर्षासाठी निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्याच धर्तीवर निवृत कर्मचाऱ्यांच्या थकीत रक्कमेसाठीही 300 कोटी रुपयांची तरतूद करण्यात यावी. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी राज्य सरकारकडून एसटीला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या थकीत देण्यासाठी विशेष तरतूद करून निधी द्यावा, अशी मागणी आज आम्ही केली आहे, अशी माहिती श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

हेही वाचा -Power Cut In Mumbai : मुंबईत अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने अनेक विभागात बत्ती गुल

ABOUT THE AUTHOR

...view details