महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Update : मुंबईत रविवारी ३९९ रुग्णांची नोंद, शून्य मृत्यू

By

Published : Jul 10, 2022, 9:09 PM IST

मुंबईत आज ( रविवारी ) ३९९ रुग्णांची ( 399 new Corona patients Mumbai ) नोंद झाली आहे. आज महिनाभरानंतर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ३५६ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

Mumbai Corona Update
Mumbai Corona Update

मुंबई - मुंबईत मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्येत वाढ होऊन दिवसाला २ हजारावर रुग्ण आढळून येत होते. त्यानंतर चाचण्यांची संख्या कमी केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत ( Mumbai Corona Update ) घट होऊ लागली आहे. आज ( रविवारी ) ३९९ रुग्णांची ( 399 new Corona patients Mumbai ) नोंद झाली आहे. आज महिनाभरानंतर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या ३५६ बेडवर रुग्ण असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

३.८३ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह :मुंबईत गेल्या २४ तासात १० हजार ४१७ चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३९९ नवे रुग्ण आढळून आले ( Mumbai Corona Update ) आहेत. चाचण्यांच्या प्रमाणात ३.८३ टक्के रुग्ण पॉजिटीव्ह आढळून आले आहेत. आज शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. ७६१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ११ लाख १८ हजार ७९५ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ९५ हजार ४१८ रुग्ण बरे झाले आहेत. तर १९ हजार ६२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ३ हजार ७६५ सक्रिय रुग्ण ( Active Corona Patients ) आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी १२९१ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. गेल्या आठवडाभरातातील कोरोना वाढीचा दर ०.०५२ टक्के इतका आहे.



रुग्णसंख्या स्थिर :मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २ हजार ८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजाराच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट झाली. मार्च एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ५० च्या खाली आली होती. मे महिन्यात रुग्णसंख्या १०० च्या वर गेली. जून महिन्यात रुग्णसंख्या वाढून १६ जूनला २३६६, २३ जूनला २४७९, ३० जुनला १२६५ रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर त्यात घट होऊन १ जुलैला ९७८, २ जुलैला ८११, ३ जुलैला ७६१, ४ जुलैला ४३१,५ जुलैला ६५९, ६ जुलैला ६९५, ७ जुलैला ५४०, ८ जुलैला ५३०, ९ जुलैला ४९९, १० जुलैला ३९९ रुग्णांची नोंद झाली आहे.



१०९ वेळा शून्य मृत्यूची नोंद :मुंबईमध्ये १७ ऑक्टोबर २०२१ रोजी पहिल्यांदा शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत एकूण १०९ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. फेब्रुवारी महिन्यात ८ वेळा तर मार्च महिन्यात २७ वेळा, एप्रिल महिन्यात २६ वेळा, मे महिन्यात २८ वेळा, जून महिन्यात ७ वेळा तर जुलै महिन्यात ३ वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Political crisis in Maharashtra : न्यायालयाचा निकाल सरकारच्या विरोधात गेला तर, पुन्हा भुकंप येऊ शकतो? - माजी मंत्री वडेट्टीवार

ABOUT THE AUTHOR

...view details