महाराष्ट्र

maharashtra

Childrens Vaccination Mumbai : मुंबईत १२ ते १४ वयोगटातील मुलांचे ३०० केंद्रांवर लसीकरण

By

Published : Mar 14, 2022, 8:33 PM IST

केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार पालिका, सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांना येत्या १६ मार्चपासून लसीकरण केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लसीकरण संग्रहित छायाचित्र
लसीकरण संग्रहित छायाचित्र

मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिम सुरु आहे. याचाच एक भाग म्हणून केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली आहे. त्यानुसार पालिका, सरकारी आणि खासगी लसीकरण केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील मुलांना येत्या १६ मार्चपासून लसीकरण केले जाईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे.

लसीकरण मोहीम

मुंबईमध्ये मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रसार आहे. हा प्रसार रोखण्यासाठी १६ जानेवारी २०२१ पासून मुंबईमध्ये लसीकरण मोहीम सुरु झाली. या मोहिमेदरम्यान आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी, वयोवृद्ध, १८ वर्षावरील नागरिकांना व नंतर १५ ते १७ वयोगटातीला मुलांना लस दिली जात आहे. आतापर्यंत मुंबईमधील ११८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला तर ९९ टक्के नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. लहान मुलांच्या शाळा सुरु झाल्या असताना त्यांना लस कधी देणार असा प्रश्न अनेकवेळा उपस्थित करण्यात आला आहे. याच दरम्यान आज केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांना लस देण्याचे घोषित केले आहे.

'अडथळा येणार नाही'

केंद्र सरकारने १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांना १६ मार्चपासून लस देण्याचे जाहीर केले आहे. पालिका, सरकारी आणि खासगी अशा ३०० लसीकरण केंद्रांवर सध्या लसीकरण सुरु आहे. याच ३०० केंद्रांवर १२ ते १४ वयोगटातील लहान मुलांना लास दिली जाईल. केंद्र सरकारने अद्याप कोणती लस द्यायची हे जाहीर केले नसले तरी कोवॅक्सीन लस दिली जाईल. पालिकेकडे लसीचा साठा असून लसीकरणात कोणताही अडथळा येणार नाही. या वयोगटातील ३ लाख ५० हजार लहान मुले असून ती शाळेत जाणारी असल्याने शाळेतही लसीकरण केले जाईल, असे काकाणी म्हणाले.

हेही वाचा -Mumbai Corona Update : मुंबईत दोन वर्षातील सर्वात कमी रुग्णांची नोंद, २७ नवे रुग्ण, शून्य मृत्यूची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details