महाराष्ट्र

maharashtra

Mumbai Corona Update : मुंबईत कोरोनाचा स्फोट, २४ तासांत १० हजार ८६० नव्या रुग्णांची नोंद

By

Published : Jan 4, 2022, 8:38 PM IST

मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १०८ रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन गेले दोन दिवस ८ हजारच्या वर रुग्ण आढळून आले होते. आज (४ जानेवारीला) त्यात वाढ होऊन १० हजार ८६० रुग्णांची नोंद झाली.

BMC
बीएमसी

मुंबई - मुंबईत डिसेंबर महिन्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. डिसेंबरच्या सुरुवातीला १०८ रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होऊन गेले दोन दिवस ८ हजारच्या वर रुग्ण आढळून आले होते. आज (४ जानेवारीला) त्यात वाढ होऊन १० हजार ८६० रुग्णांची नोंद झाली. तसेच, आज २ मृत्यूची नोंद झाली आहे.

हेही वाचा -Maharashtra Corona Case : राज्यात 18 हजार 466 नवे कोरोनाग्रस्त, 20 मृत्यू

रुग्णसंख्या वाढली असली तरी, बहुसंख्य रुग्ण हे लक्षणे नसलेले असल्याने रुग्णालयातील ८९ टक्के बेड रिक्त आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने मुंबईकरांचे व आरोग्य विभागाचे टेंशन वाढले आहे.

१० हजार ८६० नव्या रुग्णांची नोंद -

मुंबईत आज (४ जानेवारीला) १० हजार ८६० नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर, २ मृत्यूची नोंद झाली आहे. आज ६५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण ८ लाख १८ हजार ४६२ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख ५२ हजार १२ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १६ हजार ३८१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ४७ हजार ४७६ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२ टक्के तर, रुग्ण दुपटीचा कालावधी ११० दिवस इतका आहे. मुंबईमधील ३८९ इमारती आणि १६ झोपडपट्ट्या सील करण्यात आल्या आहेत. २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.६३ टक्के इतका आहे.

८९ टक्के बेड रिक्त -

मुंबईत आज आढळून आलेल्या १० हजार ८६० रुग्णांपैकी ९ हजार ६६५ म्हणजेच, ८९ टक्के लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. आज ८३४ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले. ५२ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली आहे. मुंबईत रुग्णालयांमध्ये ३०५६५ बेडस असून त्यापैकी ४४९१ बेडवर म्हणजेच ११ टक्के बेडवर रुग्ण आहेत. इतर ८९ टक्के बेड रिक्त आहेत.

अशी वाढली रुग्णसंख्या -

मुंबईत 2020 च्या मार्च महिन्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून मुंबईत कोरोनाचा प्रसार आहे. 2021 च्या फेब्रुवारी महिन्यात दुसरी लाट आली. एप्रिल महिन्यात रुग्णसंख्या ११ हजारावर गेली होती. जूनपासून त्यात घट होऊ लागली. १ डिसेंबरला कोरोनाचे १०८ नवे रुग्ण आढळून आले होते. २ डिसेंबरला त्यात वाढ होऊन २२८ रुग्ण आढळून आले. १७ डिसेंबरला २९५, १९ डिसेंबरला ३३६, २२ डिसेंबरला ४९०, २३ डिसेंबरला ६०२, २४ डिसेंबरला ६८३, २५ डिसेंबर ७५७, २६ डिसेंबर ९२२, २७ डिसेंबरला ८०९, २८ डिसेंबरला १३७७, २९ डिसेंबरला २५१०, ३० डिसेंबर ३६७१, ३१ डिसेंबरला ५६३१, १ जानेवारी 2022 ला ६३४७, २ जानेवारीला ८०६३, ३ जानेवारीला ८०८२, ४ जानेवारीला १०, ८६० नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

नऊ वेळा शून्य मृत्यूची नोंद -

मुंबईमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर गेल्या काही महिन्यांत १ ते ६ मृत्यूंची नोंद झाली होती. १७ ऑक्टोंबर २०२१ रोजी शून्य मृत्यूची नोंद झाली. त्यानंतर ११ डिसेंबर, १५ डिसेंबर, १८ डिसेंबर, २० डिसेंबर, २२ डिसेंबर, २५ डिसेंबर, ३० डिसेंबर आणि २ जानेवारीला शून्य मृत्यूची नोंद झाली.

धारावीत २५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण -

मुंबईतील धारावी ही सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून प्रसिद्ध आहे. या झोपडपट्टीत दाटीवाटीने लोक राहत असल्याने धारावी कोरोनाची हॉटस्पॉट झाली होती. पहिल्या लाटेदरम्यान धारावीत दिवसाला ७० हून अधिक रुग्णांची नोंद झाली होती. ८ एप्रिलला दुसऱ्या लाटेत सर्वाधिक ९९ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर कोरोनाचा प्रसार आटोक्यात आल्याने धारावीत गेले काही महिने १ ते ५ रुग्ण आढळून येत होते. कित्तेकवेळा धारावीत शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र, आता मुंबईत पुन्हा रुग्णसंख्या वाढल्याने धारावीतही रुग्ण वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासांत धारावीत ४० नवे रुग्ण आढळून आले आहेत. या आधी १८ मे ला सर्वात जास्त रुग्णांची नोंद झाली होती. आज ४० नवे रुग्ण आढळून आल्याने धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ७ हजार ४३८ इतकी झाली आहे. आतापर्यंत ६ हजार ७६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. धारावीत सध्या २५९ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा -वॉटर टॅक्सी गाठण्यासाठी मुंबईकरांना मिळणार २०० स्थानिक टॅक्सींची मदत

ABOUT THE AUTHOR

...view details