महाराष्ट्र

maharashtra

शिवसेनेची ऊस परिषद : एफआरपी अधिक 250 रुपये दर देण्याची मागणी

By

Published : Nov 22, 2019, 11:31 PM IST

Updated : Nov 23, 2019, 4:39 AM IST

शिवसेनेने यावर्षीच्या गाळप हंगामातील उसाला एफआरपी अधिक २५० रुपये दर देण्याची मागणी केली आहे. राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे ऊस परिषदे घेऊन ही मागणी केली आहे.

शिवसेना ऊस परिषद

कोल्हापूर -शिवसेनेने यावर्षीच्या ऊसाला एफआरपी अधिक 250 रुपये दर देण्याची मागणी केली आहे. राधानगरी तालुक्यातील तुरंबे येथे ऊस परिषद घेऊन ही मागणी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून ऊस दरावरून शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. यावर्षी तिसरी ऊस परिषद घेऊन आपली भूमिका सेनेने जाहीर केली. चालू हंगामातील या दराच्या मागणीसोबतच गेल्या वर्षीच्या थकीत ऊस बिला प्रश्नी 27 तारखेला साखर सहसंचालक कार्यालयावर धडक देण्याचा इशाराही सेनेने दिला आहे.

शिवसेनेची एफआरपी अधिक 250 रुपये दर देण्याची मागणी

ऊस परिषदेतील प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे -

  • एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी मिळावी.
  • चालू वर्षीच्या गळीत हंगामात उसाला प्रतिटन एफआरपी अधिक 250 रुपये मिळावा.
  • पूर बाधित क्षेत्रातील ऊस तोडीला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे.

  • कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

  • पुरावेळी या परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्यानंतर बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी.

शेती पंपाची वीज बिल माफ करावे.

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी

  • शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन मिळावी

    शिवसेना ऊस परिषद
  • ऊस दरासंदर्भात शिवसेनेच्या आंदोलनांचे टप्पे -

    1. राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्याच्या वतीने उद्या दुपारी 12 वाजता मुदाळतिट्टा येथे महारास्ता रोको आंदोलन
    2. 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापुरातील दसरा चौक येथून साखर सह. संचालक यांच्या कार्यालयावर जागर मोर्चा

    Intro:अँकर : शिवसेनेने यावर्षीच्या ऊसाला एफआरपी अधिक 250 रुपये दर देण्याची मागणी केलीय. राधानगरी तालुज्यातील तुरंबे येथे ऊस परिषद घेऊन ही मागणी करण्यात आलीय. गेल्या दोन वर्षांपासून ऊस दरावरून शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. यावर्षी तिसरी ऊस परिषद घेऊन आपली भूमिका सेनेने जाहीर केली. चालू हंगामातील या दराच्या मागणीसोबतच गेल्या वर्षीच्या थकीत ऊस बिला प्रश्नी 27 तारखेला साखर सहसंचालक कार्यालयावर धडक देण्याचा इशाराही सेनेने दिलाय.

    बाईट : विजय देवणे,जिल्हाप्रमुखBody:ऊस परिषदेतील प्रमुख ठराव पुढीलप्रमाणे

    • एफआरपी चे तुकडे न करता एकरकमी मिळावी.
    • चालू वर्षीच्या गळीत हंगामात ऊसाला प्रतिटन एफआरपी अधिक 250 रुपये मिळावे
    • पूर बाधित क्षेत्रातील ऊस तोडीला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे
    • कोल्हापूर जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा
    • पुरावेळी या परतीच्या पावसात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पंचनाम्यानंतर बाजार भावाप्रमाणे नुकसान भरपाई मिळावी
    • शेती पंपाची वीज बिल माफ करावे
    • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी
    • शेतकरी आणि शेतमजुरांना पेन्शन मिळावी

    ऊस दरासंदर्भात शिवसेनेच्या आंदोलनांचे टप्पे

    1) राधानगरी, भुदरगड आणि कागल तालुक्याच्या वतीने उद्या दुपारी 12 वाजता मुदाळतिट्टा येथे महारास्ता रोको आंदोलन

    2) 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता कोल्हापुरातील दसरा चौक येथून साखर सह. संचालक यांच्या कार्यालयावर जागर मोर्चाConclusion:.
    Last Updated :Nov 23, 2019, 4:39 AM IST

    ABOUT THE AUTHOR

    ...view details