महाराष्ट्र

maharashtra

Eknath Shinde : कोल्हापुरात शिवसैनिक आक्रमक; राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या कार्यालयावर निघालेल्या मोर्चात पोलीस आंदोलकांमध्ये झटापट

By

Published : Jun 27, 2022, 2:34 PM IST

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ( Rajendra Patil-Yedravakar ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्यानंतर आक्रमक शिवसैनिकांनी ( Aggressive Shiv Sena ) त्यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चा दरम्यान शिवसैनिक तसेच पोलीसांत मोठी झटापट झाली. अपक्ष तिकिटावर लढत जिंकून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये ( Mahavikas Aghadi Sarkar ) आरोग्य राज्यमंत्रीपद ( Minister of State for Health ) मिळाले. मात्र, तरीही बंडखोरी करत त्यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटाला सामील झाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिक त्यांच्या जयसिंगपूरमधील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला.

Fighting among the police agitators
पोलीस आंदोलकांमध्ये झटापट

कोल्हापूर -आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर ( Rajendra Patil-Yedravakar ) यांनी शिवसेनेशी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या गटाला जाऊन मिळाल्यानंतर आक्रमक शिवसैनिकांनी ( Aggressive Shiv Sena ) त्यांच्या संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला आहे. या मोर्चा दरम्यान शिवसैनिक तसेच पोलीसांत मोठी झटापट झाली. अपक्ष तिकिटावर लढत जिंकून आलेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये ( Mahavikas Aghadi Sarkar ) आरोग्य राज्यमंत्रीपद ( Minister of State for Health ) मिळाले. मात्र, तरीही बंडखोरी करत त्यांनी एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांच्या गटाला सामील झाले. त्यामुळे आक्रमक झालेल्या शिवसैनिक त्यांच्या जयसिंगपूरमधील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला.

मोठा पोलिस बंदोबस्त तैनात-कोणाताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, मोर्चा जसा यड्रावकर यांच्या कार्यालयाजवळ पोहोचला यावेळी पोलिसानी आंदोलकांना रोखून धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी संतप्त आंदोलकांनी पोलिसांच्या अंगावर जात बॅरिकेट्स तोडल्या. आंदोलकांनी राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा संपर्क कार्यालयाचा बोर्ड तोडून टाकला यामुळे यड्रावकर याच्या समर्थकांकडून ही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा - आलिया भट्टने दिली 'गुड न्यूज', "कुणी तरी येणार येणार गं!"

आंदोलक व यड्रावकर समर्थक सामोरासमो -बंडखोरी करत एकदा शिंदे यांच्या गटात झालेल्या राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात जयसिंगपुर येथे शिवसेनेच्या वतीने जाब विचारण्यासाठी यांच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी संतप्त आंदोलक व यड्रावकर समर्थक यांच्यामध्ये झटापट झाली मात्र वेळीच पोलिसांनी मध्यस्थी करत गर्दी पांगवली. मात्र या सर्वांमध्ये आक्रमक शिवसैनिकाकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयाचे बोर्डाची तोडफोडही करण्यात आली.


झटापटीत पोलीस कोसळले -जयसिंगपूर येथील एसटी स्थानक परिसरातून चालू झालेला हा मोर्चा यड्रावकर यांच्या संपर्क कार्यालयावर येऊन धडकणार होता. यामुळे यड्रावकर याच्या समर्थकांकडून ही संपर्क कार्यालयाबाहेर व त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठ्या प्रमाणात त्यांचे कार्यकर्ते जमा झाले होते. जयसिंगपूर मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसेनेकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत चालू झालेला मोर्चा संपर्क कार्यालय जवळ येतात काही अंतरावर पोलिसांनी अडवला मात्र आक्रमक झालेल्या शिवसैनिक व पोलिसानंमध्ये झटापट झाली यामध्ये पोलिसांना ढकलून दिल्याने अनेक पोलीस खाली कोसळले यामध्ये महिला पोलिसांसह पुरुष ही किरकोळ जखमी झाले आहेत.

हेही वाचा -Shivsenas rebel of MLAs petition : एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेनेची लढाई सर्वोच्च न्यायालयात, दोन दिग्गज वकील मांडणार बाजू

ABOUT THE AUTHOR

...view details