महाराष्ट्र

maharashtra

Lumpy Disease in Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात लंपी आजाराचा कहर; एकाच दिवसात 7 जनावरांचा मृत्यू

By

Published : Sep 18, 2022, 1:07 PM IST

Lumpy disease in kolhapur
लंपीमुळे एकाच दिवशी सात जनावरांचा मृत्यू ()

लंपीमुळे एकाच दिवशी सात जनावरांचा मृत्यू ( Seven animals died in a single day ), 5 गायी आणि 2 बैलांचा समावेश. लंपी आजाराने बाधित कोल्हापूर जिल्ह्यातील 7 जनावरांचा एकाची दिवशी मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 5 गायी आणि 2 बैलांचा समावेश ( due to lumpy 5 cows and 2 bulls dead ) आहे. कोल्हापूरात एकाच दिवशी 7 जनावरांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सुद्धा उपाययोजना करण्यासाठी गतिमान झाल्याचे दिसत आहे.

कोल्हापूर : लंपी आजाराने बाधित कोल्हापूर जिल्ह्यातील 7 जनावरांचा एकाची दिवशी मृत्यू ( Seven animals died in a single day ) झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये 5 गायी आणि 2 बैलांचा समावेश ( due to lumpy 5 cows and 2 bulls dead ) आहे. कोल्हापूरात एकाच दिवशी 7 जनावरांचा मृत्यू झाल्याने प्रशासन सुद्धा उपाययोजना करण्यासाठी गतिमान झाल्याचे दिसत आहे.


कोणत्या भागातील दगावली :रांगोळी येथील आप्पासो रामचंद्र काटकर यांच्या मालकीचा बैल, चंदूर येथील माणिक मायप्पा पुजारी यांची दोन वर्षांची गाय, कबनूर येथील सुनील विलास साळुंखे यांच्या मालकीचा बैल आणि भाऊसो दादू कोले यांची गाय, इचलकरंजी येथील लक्ष्मण शंकर कलागते आणि आशिष अनिल वाघमोडे यांची प्रत्येकी एक गाय, अतिग्रे येथील संस्कार प्रकाश गोंधळी यांच्या मालकीची एक गाय. अशा एकूण 7 जनावरांचा आजपर्यंत मृत्यू झाल्याची नोंद आहे.

65 जनावरांना लागण, 22 झाले बरे : दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात लम्पि आजाराने बाधित असलेली आजपर्यंत अधिकृत 65 जनावरांचा समावेश ( 65 animals have been infected in kolapur ) आहे. त्यापैकी 7 जनावरांचा मृत्यू झाला असून 22 जनावरं बरी झाली आहेत. उर्वरित सर्व जनावरांवर उपचार सुरू झाले असून जिल्हाभरात लसीकरण सुद्धा सुरू असल्याची माहिती पशुसंवर्धन उप आयुक्त डॉ. वाय. ए. पठाण यांनी दिली. शिवाय हा आजार केवळ गाय, बैल यांना होत असल्याने याचा इतरांना धोका नाही त्यामुळे कोणत्याही पद्धतीच्या अफवांना सुद्धा बळी पडू नका असे आवाहन त्यांनी केले. शिवाय या काळात दूध सुद्धा आपल्यासाठी हानिकारक नसून कोणीही घाबरू नये असेही त्यांनी म्हंटले आहे. पशुधन मालकांनी आपल्या जनावरांचे वेळेतच लसीकरण करून घ्यावे जेणेकरून साथ रोगास अटकाव घालता येईल. लंपीचे भय न बाळगता आपल्या सर्व जनावरांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details