महाराष्ट्र

maharashtra

Sanjay Raut on Rana Couple : गुन्हे फक्त आमच्यावरच सिद्ध होतात - संजय राऊत

By

Published : May 6, 2022, 3:01 PM IST

पुणे महानगरपालिकेची निवडणूक ( Pune Municipal Corporation Election ) डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना नेते संजय राऊत पुणे दौऱ्यावर ( Shiv Sena Leader Sanjay Raut on Pune Tour ) असल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यासह राज ठाकरे यांच्यावरही टीका ( Sanjay Raut on Rana Couple ) केली. हल्ली देशात आणि राज्यात दिलासा घोटाळा सुरू आहे. त्यात अनेक कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप हे फक्त आमच्यावरच सिद्ध होतात. बाकी इतरांवर ते का सिद्ध होत नाही. हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे

Sanjay Raut on Rana Couple
शिवसेना नेते संजय राऊत

पुणे - संजय राऊत हे पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे महानगरपालिकेची निवडणूक ( Pune Municipal Corporation Election ) डोळ्यासमोर ठेऊन शिवसेना नेते संजय राऊत पुणे दौऱ्यावर ( Shiv Sena Leader Sanjay Raut on Pune Tour ) असल्याची चर्चा आहे. दरम्यान त्यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राणा दाम्पत्यासह राज ठाकरे यांच्यावरही टीका ( sanjay raut on navneet rana ) केली. राणा दाम्पत्यावर लावलेले राजद्रोहाचे कलम चुकीचे आहे, असे मुंबई सत्र न्यायालयाने म्हटले आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, हल्ली देशात आणि राज्यात दिलासा घोटाळा सुरू आहे. त्यात अनेक कंगोरे आहेत. गुन्हे किंवा आरोप हे फक्त आमच्यावरच सिद्ध होतात. बाकी इतरांवर ते का सिद्ध होत नाही. हा एक फार मोठा संशोधनाचा विषय आहे, असे यावेळी शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. पुण्यात शिवसेना नेते संजय राऊत पत्रकारांशी बोलत होते.

असे म्हणणे चुकीचे आहे - मुंबईच्या योगदानात परप्रांतीयांचा वाटा आहे, असे मनसेचे नेते म्हणत आहेत असे राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, मुंबईच्या योगदानात परप्रांतीयांचा वाटा आहे. असे म्हणणे चुकीचे आहे, हे आता बंद करा असे देखील यावेळी राऊत म्हणाले.

शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया

मनसे जिथे सभा घेतंय तिथे शिवसेना घेतेय असा अर्थ लाऊ नका -मनसे जिथे सभा घेतेय तिथे शिवसेना घेतेय असा देखील राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, औरंगाबादच्या त्या मैदानात बाळासाहेब ठाकरेंनी सर्वात आधी सभा घेतली. तेव्हा ही मोठी गर्दी झाली होती. मग राज ठाकरे अथवा अन्य नेत्यांनी घेतल्या, आता उद्धव ठाकरे सभा घेतायेत. याचा अर्थ मनसे जिथे सभा घेतेय तिथे शिवसेना घेतेय असा अर्थ लाऊ नका असे देखील यावेळी राऊत म्हणाले. तसेच मला जनाब म्हटले याबाबत काही वाटले नाही. पण हे कोण म्हणतेय हे पहा उचलली जीभ लावली टाळ्याला, असा टोला देखील राऊत यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा -Shahu Maharaj Kolhapur : 100 सेकंद स्तब्ध उभे राहून शाहू महाराजांना अभिवादन, वाचा... आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांच्याविषयी

ABOUT THE AUTHOR

...view details