महाराष्ट्र

maharashtra

Encroachment Action Kolhapur : राजारामपुरी परिसरातील अतिक्रमणे हटवली; महापालिकेची कारवाई

By

Published : May 11, 2022, 6:37 PM IST

Updated : May 11, 2022, 7:06 PM IST

अतिक्रमण कारवाई कोल्हापूर
अतिक्रमण कारवाई कोल्हापूर ()

शहराचा महत्त्वाचा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजारामपुरी परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा ( Municipal Corporation action on encroachment Kolhapur ) हातोडा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजारामपुरी परिसरात पार्किंगची ( Parking problem in Rajarampuri area ) व्यवस्था बिकट झाली होती. या कारणाने गाड्या रस्त्यावर पार्क करण्यात येते होते. यामुळे ट्रॅफिकचा प्रश्नही निर्माण झाला होता.

कोल्हापूर - महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून आज (बुधवारी) मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहराचा महत्त्वाचा बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजारामपुरी परिसरातील अतिक्रमणावर महापालिकेचा ( Municipal Corporation action on encroachment Kolhapur ) हातोडा पडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून राजारामपुरी परिसरात पार्किंगची ( Parking problem in Rajarampuri area ) व्यवस्था बिकट झाली होती. या कारणाने गाड्या रस्त्यावर पार्क करण्यात येते होते. यामुळे ट्रॅफिकचा प्रश्नही निर्माण झाला होता. हीच समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने ही कारवाई केली असून पुढील 2 दिवस अशीच कारवाई सुरू राहणार आहे. शिवाय अन्य ठिकाणी सुद्धा जेथे अडथळा निर्माण होईल तेथे महापालिकेचा हातोडा पडणार असल्याचे अतिक्रमण विभागाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया देताना पालिका अधिकारी

महत्वाची बाजारपेठ मात्र पार्किंगची समस्या मोठी :राजारामपुरी बाजारपेठही शहरातली सर्वात पॉश आणि मोठी बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथे नामवंत कंपन्यांचे शोरूम देखील आहेत. रोज लाखोंची उलाढाल या बाजारपेठत होत असते. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून येथे पार्किंगची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. काही दुकानदारांनी जागेत अतिक्रमण केल्याने खरेदीसाठी आलेले ग्राहक आपल्या वाहने रस्त्यावरच पार्क करत असत. यामुळे वाहतुकीची ही मोठी कोंडी येथे निर्माण होत असते. महापालिकेने यापूर्वी 2 वेळा संबधित दुकानदारास अतिक्रमण काढण्यास नोटीसही बजावण्यात आल्या होत्या. मात्र स्वतः हून अतिक्रमण न काढल्याने आज महापालिकेने धडक कारवाई केली आहे. यामुळे राजारामपुरी परिसरातील रस्ते मोकळे झाले असून वाहतुकीस येणारे अडथळे कमी होताना दिसत आहेत.


पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झाली होती बैठक :राजारामपुरी परिसर हे हार्ट ऑफ कोल्हापूर आहे. त्या ठिकाणी होणारी पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याची ग्वाही सतेज पाटील यांनी काल (मंगळवारी) झालेल्या बैठकीत दिली होती. राजारामपुरी परिसरातील वाढलेली वाहतूक कोंडी आणि पार्किंग व्यवस्था या प्रश्नावर सतेज पाटील यांनी परिसरातील व्यापारी, मंडळे, पोलीस प्रशासन आणि महानगर पालिका यांच्यासोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी ही समस्या तत्काळ संदर्भात महानगरपालिका व पोलीस प्रशासनास आदेश दिले होते. त्यानुसार दुसऱ्या दिवशी महापालिकेच्यावतीने ही कारवाई सुरू करण्यात आली असून या कारवाईस अनेक जणांचा विरोध देखील झाला. मात्र त्यावेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा येथे तैनात करण्यात आला होता.

हेही वाचा -Farmers Agitation : नवी मुंबईतील शेतकऱ्यांचे मुंबईत आंदोलन, शरद पवारांच्या घरी धडक देण्याचा इशारा

Last Updated :May 11, 2022, 7:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details