महाराष्ट्र

maharashtra

महाआघाडी सरकार आतापर्यंत एकही केस कोर्टात जिंकले नाही, यापुढेही जिंकणार नाहीत - चंद्रकांत पाटील

By

Published : Jan 28, 2022, 3:02 PM IST

Updated : Jan 28, 2022, 5:30 PM IST

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचा एकही निर्णय सुप्रीम कोर्टात टिकलेला नाही. अनिल देशमुख यांच्या केसपासून ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रभारी नेमण्याचा विषय, जावयाला दिलेले 1500 कोटींचे टेंडर असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार कोर्टातील केस जिंकले नाहीयत. तरीही ते का निर्णय घेतात माहिती नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

Chandrakant Patil
Chandrakant Patil

कोल्हापूर - गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडी सरकारचा एकही निर्णय सुप्रीम कोर्टात टिकलेला नाही. अनिल देशमुख यांच्या केसपासून ग्रामपंचायतीमध्ये सरपंच प्रभारी नेमण्याचा विषय, जावयाला दिलेले 1500 कोटींचे टेंडर असे अनेक विषय आहेत ज्यामध्ये महाराष्ट्र सरकार कोर्टातील केस जिंकले नाहीयत. तरीही ते का निर्णय घेतात माहिती नाही, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांचे निलंबन मागे घेण्याबाबत निर्णय दिला आहे, याबाबत बोलताना त्यांनी कोल्हापुरात ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील प्रतिक्रिया देताना
महाराष्ट्र सरकार जे निर्णय घेतात ते कोर्टात टिकत नाहीत; 'हे' सुद्धा टिकणार नाही-
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, दुकानात वाईन विक्रीचा निर्णय घेतला आहे, तो सुद्धा आता कोर्टात टिकणार आहे का, असा सवाल करत विद्यापीठ कायदा बदलला तो सुद्धा टिकणार का? प्रताप सरनाईक यांना जी सूट दिली तो निर्णय टिकणार आहे ? पण कृत्रिमपणे बहुमत नसतानाही तीन जण एकत्र येत जे निर्णय करत आहेत ते खूप होत आहे. शिवाय कोर्ट वगैरे काही नाही, आम्हीच निर्णय करणार असे झाले आहे अशी टीका सुद्धा यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केली. शिवाय नारायण राणे यांचीही अटक टिकली नाही असेही त्यांनी म्हटले.
Last Updated :Jan 28, 2022, 5:30 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details