महाराष्ट्र

maharashtra

महापुरामुळे चिखली गावातील गुऱ्हाळ चालक संकटात, अश्रू अनावर; शासनाकडे केली 'ही' मागणी

By

Published : Jul 29, 2021, 12:07 AM IST

Updated : Jul 29, 2021, 12:29 AM IST

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील चिखली हे गाव गूळ उत्पादक गाव म्हणून ओळखले जाते. गावात जवळपास 35 ते 40 गुऱ्हाळघर आहेत.

chikhali
गुऱ्हाळ चालकांना अश्रू अनावर

कोल्हापूर - 2019 च्या महापुरातून सावरतो न् सावरतो तोच यावर्षीही जिल्ह्यात महापुराने धारण केलेल्या रौद्ररुपामुळे अनेकांना अक्षरशः रस्त्यावर आणले आहे. यामध्ये सर्वाधिक फटका जिल्ह्यातल्या चिखली गावातील गुऱ्हाळघर मालकांना बसला आहे. गावात जवळपास 35 ते 40 गुऱ्हाळघरं आहेत. त्यातील अनेकजणांना 2019 नंतर झालेल्या नुकसानीनंतर आपला हा व्यवसाय बंद केला, तर यावर्षीही अनेकांवर आपले गुऱ्हाळघर बंद करण्याची वेळ आली आहे. यातील काही गुऱ्हाळघर चालकांना तर झालेल्या नुकसानीची माहिती देताना अश्रूही अनावर झाले. आता सरकारनेच आम्हाला यातून बाहेर काढावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

गुऱ्हाळ चालकांना अश्रू अनावर
  • दर्जेदार गुणवत्तेचा गूळ बनवणारे गाव म्हणून चिखली गावाची ओळख :
    fगुऱ्हाळ चालकांना अश्रू अनावर

कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातील चिखली हे गाव गूळ उत्पादक गाव म्हणून ओळखले जाते. गावात जवळपास 35 ते 40 गुऱ्हाळघर आहेत. यातील काही गुऱ्हाळघरं 2019 च्या महापुरात पूर्णपणे जमीनदोस्त झाली तर काहींनी लाखो रुपये खर्च करून ती दुरुस्त करून घेतली. सध्या 20 ते 25 च्या आसपास गुऱ्हाळघर सुरू असल्याचे गावातील काही व्यावसायिकांनी सांगितले आहे. मात्र, यावर्षीसुद्धा आलेल्या महापुरामध्ये पुन्हा एकदा त्यांचे मोठं नुकसान झाले आहे. लाखो रुपये खर्च करून पुन्हा उभे केलेल्या गुऱ्हाळघरांचे झालेले नुकसान पाहून अनेकांना अश्रू अनावर होत आहेत. गेल्या काही वर्षांपासून चिखली गावात गुऱ्हाळ व्यवसाय करत असणारे दिनकरराव कळके यांच्याही गुऱ्हाळघराचे 2019 च्या महापुरात प्रचंड नुकसान झाले होते. मात्र आता पुन्हा महापुराने ते आर्थिक संकटात आले असून आता आम्ही कसे जगायचे असा सवाल ते करत आहेत. हे सर्व सांगत असताना त्यांना अश्रूही अनावर होत असून सरकारनेच यातून आम्हाला बाहेर काढावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

गुऱ्हाळ चालकांना अश्रू अनावर
  • गुऱ्हाळघरं उभी करायला लाखो रुपयांचा खर्च :

आता पुन्हा गुऱ्हाळघरं पूर्वीप्रमाणे उभी करण्यासाठी सर्वांना लाखो रुपयांचा खर्च होणार आहे. अनेकांच्या गंज्या वाहून गेल्या आहेत तर अनेकांच्या गुऱ्हाळ घरातील यंत्र खराब झाली आहेत. काहींच्या काहिली सुद्धा वाहून गेल्या असून इतर ज्या वस्तू असतात त्या सुद्धा वाहून गेल्याने गुऱ्हाळघर नव्यानेच उभे करावे लागणार आहे. आता अनेकजण तर हा व्यवसायच बंद करण्याच्या विचारात आहेत.

महापुराचा फटका चिखली गावातील गुऱहाळांना

हेही वाचा -दूधसागर धबधब्याजवळ एक्सप्रेस रुळावरून खाली घसरली; पाहा व्हिडिओ

Last Updated :Jul 29, 2021, 12:29 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details