महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापूरमध्ये 'बीजांकुर गणेशाला' यंदा ग्राहकांची पसंती

By

Published : Sep 7, 2021, 7:46 PM IST

ganesha idol
ganesha idol

शाडूपासून बनवलेल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये विविध फळभाज्यांच्या बिया सुद्धा असणार आहेत. विसर्जनानंतर भाज्यांच्या रूपात गणपती बाप्पा आपल्याबरोबर राहील.

कोल्हापूर - दरवर्षी प्रत्येकजण आपल्या बाप्पाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच उत्सवांचे स्वरूप बदलत चालले आहे. निसर्गाचे संरक्षण आणि प्रदूषण मुक्तीची संकल्पना घेऊन कोल्हापुरातल्या विविध ठिकाणी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती बनवल्या जात आहेत. येथील निवृत्ती चौकात सुद्धा 'बिजांकुर गणेश' मूर्तीची विक्री चालू आहे. शाडूपासून बनवलेल्या गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. यामध्ये विविध फळभाज्यांच्या बिया सुद्धा असणार आहेत. विसर्जनानंतर भाज्यांच्या रूपात गणपती बाप्पा आपल्याबरोबर राहील.

'बीजांकुर गणेशला' यंदा ग्राहकांची पसंती

पर्यावरणाच्या रक्षणासाठी अनेकांचा पुढाकार
कोल्हापुरात दरवर्षी गणेश उत्सव थाटामाटात साजरा केला जातो. प्रत्येकाच्या घरी विविध रूपात बाप्पा विराजमान होतात. यामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची विक्री केली जात आहे.प्रत्येक गणेश विसर्जनावेळी पर्यावरणाच्या रक्षणाबाबतचा मुद्दा समोर येतो. मूर्ती दान संकल्पना सुद्धा समोर येते. त्यामुळे भक्तांनी शाडूच्या गणेशमूर्ती विकत घ्याव्यात असे आवाहनही करण्यात येते. शाडूच्या मूर्तींच्या तुलनेत प्लास्टर ऑफ पॅरिस पासून बनविलेल्या मूर्ती स्वस्त असल्याने अनेकजण याकडे वळतात. मात्र विसर्जनानंतर पर्यावरणावर मोठा परिणाम होत असतो. त्यासाठी विविध संकल्पना सुद्धा समोर येताना पाहायला मिळत आहेत.

बीजांकुर गणेश

बीजांकुर गणेशाला पसंती
पर्यावरणाचा विचार करणाऱ्या अनेकांकडून शाडूच्या मूर्तीलाच प्राधान्य दिले जाते. यामध्ये अनेक कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या गणेश मूर्ती मिळत असतात. आता बीजांकुर गणेशाची संकल्पना सुद्धा काही वर्षांपासून सुरू झाली आहे. यामध्ये मूर्तीमध्येच अनेक फळभाज्यांच्या बिया असतात. या गणेश मूर्ती घराच्या अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये पाणी घेऊन त्यामध्येच विसर्जित करायच्या असतात. शाडूपासून बनवलेल्या मूर्ती पाण्यामध्ये विरघळतात. त्यामुळे प्रदूषणाचा सुद्धा मुद्दा उपस्थित होत नाही. याशिवाय मूर्तीमध्ये आधीपासूनच फळभाज्यांच्या बिया असल्यामुळे मूर्ती विसर्जन केल्यानंतर झाडाच्या रुपाने गणपती बाप्पा आपल्या समोर असणार आहेत असे विक्रेते सतीश पाटील यांनी म्हंटले आहे. विशेष म्हणजे या मूर्तींचे रंग सुद्धा नैसर्गिक असून या दिसायला सुद्धा अगदी आकर्षक आणि सुबक पद्धतीने बनविण्यात आल्या आहेत.

ग्राहकांकडून सुद्धा मोठा प्रतिसाद
बीजांकुर गणेश मूर्ती खरेदी करायला ग्राहक सुद्धा समोर येत आहेत. इतरांनीही मूर्ती विकत घ्याव्यात असे आवाहनही केले आहे. सर्वजण शाडूच्या तसेच पर्यावरणपूरक गणेश मूर्ती घ्यायला प्राधान्य देतील असेही त्यांनी म्हंटले आहे. दरम्यान, प्लास्टर ऑफ पॅरिस मूर्तीमुळे होणारे जल प्रदूषणाला पर्याय म्हणून अर्चना आणि मंगेश कुंभार यांनी बनविलेल्या 'बिजांकुर गणेश' मूर्ती घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
हेही वाचा -जळगाव जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस; नद्या, नाल्यांना पूर... पाहा व्हिडिओ

ABOUT THE AUTHOR

...view details