महाराष्ट्र

maharashtra

Kolhapur AAP Agitation : महापालिकेच्या दारातच स्विमिंग पूल? कोल्हापूरात बंद स्विमिंगपूल सुरू करण्यासाठी आपचे आंदोलन

By

Published : May 17, 2022, 4:14 PM IST

बंद स्विमिंगपूल सुरू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरातील आम आदमी पार्टीकडून अनोखे आंदोलन ( AAP Agitation For start swimming pool ) करण्यात आले. येथील महानगरपालिकेच्या दारातच प्रतिकात्मक स्विमिंग पूल आणून 'काहील आंदोलन' करण्यात आले.

Kolhapur AAP Agitation
स्विमिंगपूल सुरू करण्यासाठी आपचे आंदोलन

कोल्हापूर - बंद स्विमिंगपूल सुरू करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरातील आम आदमी पार्टीकडून अनोखे आंदोलन ( AAP Agitation For start swimming pool ) करण्यात आले. येथील महानगरपालिकेच्या दारातच प्रतिकात्मक स्विमिंग पूल आणून 'काहील आंदोलन' करण्यात आले. लवकरात लवकर शहरातील महापालिकेचे स्विमिंग पूल सुरू करावेत अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा सुद्धा यावेळी आंदोलकांनी दिला. यावेळी प्रशासनाच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा -नौदलला मिळाली मोठी ताकद; भारतीय बनावटीच्या INS सुरत व उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण, 'या' आहेत विशेषतः

काहीलीमध्येच लहान मुलांचे स्विमिंग -दरम्यान, महापालिकेचे तलाव दुरुस्ती करून नागरिकांसाठी खुले करण्यात यावेत, या मागणीसाठी आम आदमी पार्टीच्या वतीने महापालिकेच्या समोरच काहीलीमध्ये पोहून अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी लहान मुलांनी काहीलीत पोहून महापालिकेचा निषेध नोंदवला. शिवाय आपल्या घराशेजारीच स्विमिंग पूल आहे मात्र, तेच बंद असल्याने आम्हाला लांब जावे लागत असल्याचे सुद्धा लहान मुलांनी यावेळी बोलून दाखवले. त्यामुळे या लहान मुलांनी सुद्धा लवकरात लवकर स्विमिंग पूल करण्याची मागणी केली.

स्विमिंगपूल सुरू करण्यासाठी आपचे आंदोलन

तीव्र आंदोलनाचा इशारा - गेल्या अडीच वर्षांपासून छत्रपती शाहू जलतरण तलाव आणि रंकाळा येथील अंबाई टँक बंद आहे. कोरोनामुळे बंद असल्याची कारणे दिली मात्र प्रत्यक्षात अजूनही स्विमिंगपुल सुरू नाहीयेत. त्यामुळे हे स्विमिंगपूल तात्काळ सुरू करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुदधा देण्यात आला.

हेही वाचा -Mumbai bomb blast case : मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील चार आरोपींना अटक

ABOUT THE AUTHOR

...view details