महाराष्ट्र

maharashtra

2020 ला बाय-बाय गुळवणी पिऊन..! जगात भारी कोल्हापुरात 'लै भारी' फलक

By

Published : Dec 31, 2020, 5:05 PM IST

'आज धार्मिक व्रत..! सर्वजण शेपूची भाजी आणि गुळमाट सेवन करतील' अशा आशयाचा फलक कोल्हापूरात लावण्यात आला आहे. त्यामुळे या हटके फलकाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.

A club in kolhapur requests people to celebrate new year with veg food and sweets
2020 ला बाय-बाय गुळवणी पिऊन..! जगात भारी कोल्हापुरात 'लै भारी' फलक

कोल्हापूर - जगात भारी अशी ओळख असलेल्या कोल्हापूरात नेहमीच काहीतरी वेगळे पाहायला मिळत असते. आता 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सुद्धा कोल्हापुरातला एक फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. 'आज धार्मिक व्रत..! सर्वजण शेपूची भाजी आणि गुळमाट सेवन करतील' अशा आशयाचा हा फलक आहे. त्यामुळे या हटके फलकाची जिल्ह्यात चर्चा सुरू आहे. अनेकांनी तर वर्षाचा शेवट गोड करून नववर्षाचे स्वागत करायचे ठरवले आहे.

कोल्हापूरातील 'लै भारी' फलक...
नेहमी तांबडा पांढऱ्यावर ताव; पण वर्षाचा शेवट गोडखवय्यांचा शहर म्हणून कोल्हापूरची एक वेगळी ओळख आहे. हेच कोल्हापूर तांबडा-पांढरा रस्स्यासाठीसुद्धा प्रसिद्ध आहे. दरवर्षी 31 डिसेंबर रोजी कित्येक टन मांसाची विक्री होत असते. मात्र याच कोल्हापुरात आज 31 डिसेंबर रोजी मार्गशीष महिन्यातला गुरुवार असल्याने वर्षाचा शेवट गोड करून नववर्षाचे स्वागत करायचे ठरवले आहे.नववर्षाच्या हटके शुभेच्छा कोल्हापुरातल्या मंगळवार पेठ परिसरातील 'प्रिन्स क्लब' मंडळाच्या फलकावर नेहमीच हटके स्लोगन, वाक्ये लिहलेली आजपर्यंत अनेकांनी पाहिली आहेत. आता नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी त्याचबरोबर आज मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्याने या फलकावर हटके पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे, गुळवणी पिऊनच नवीन वर्षाचे स्वागत करणार असल्याचे येथील नागरिकांनी म्हटले आहे. हेही वाचा -कोल्हापूर महापालिका, न्यायालयाच्या भिंतीवर गुटखा, मावा खाऊन 'पचाक'

ABOUT THE AUTHOR

...view details