महाराष्ट्र

maharashtra

कोल्हापूर शहरातील 12 ते 14 वयोगटातील 27 हजार मुलांचे होणार लसीकरण; 8 केंद्रावर लसीकरण सुरू

By

Published : Mar 17, 2022, 10:08 PM IST

Updated : Mar 17, 2022, 10:32 PM IST

12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) आजपासून कोल्हापूर शहरात सुरुवात झाली आहे. कॉर्बोव्हॅक्स नावाची लस या वयोगटातील मुलांना देण्यात येत आहे. काल बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात काही ठिकाणी मोजक्याच मुलांचे लसीकरण करण्यात आले होते.

vaccination
लहान मुलांचे लसीकरण

कोल्हापूर : 12 ते 14 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Vaccination) आजपासून कोल्हापूर शहरात सुरुवात झाली आहे. कॉर्बोव्हॅक्स नावाची लस या वयोगटातील मुलांना देण्यात येत आहे. काल बुधवारी प्रातिनिधिक स्वरूपात काही ठिकाणी मोजक्याच मुलांचे लसीकरण करण्यात आले होते. मात्र, आजपासून लसीकरण सुरुवात झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी दिली.

कादंबरी बलकवडे - प्रशासक, कोल्हापूर महानगरपालिका

शहरात 8 ठिकाणी लसीकरण सुरू : बलकवडे

दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी आज शहरातील एकूण 8 ठिकाणी लसीकरण सुरू झाल्याची माहिती दिली. शिवाय शहरात 12 ते 14 या वयोगटातील एकूण 27 हजारांहून अधिक मुलं असून लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करण्याचे उदिष्ट असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.

जिल्ह्यात 12 ते 14 वयोगटातील 'इतकी' मुलं लाभार्थी :

कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1 लाख 91 हजार इतकी मुलं 12 ते 14 वयोगटातील आहेत. त्यांच्या लसीकरणाला सुरुवात झाली असून पुढीलप्रमाणे प्रत्येक तालुक्यातील मुल लाभार्थी आहेत.

1) आजरा : 5907
2) भुदरगड : 7358
3) चंदगड : 9175
4) गडहिंग्लज : 11081
5) गगनबावडा : 1750
6) हातकणंगले : 39989
7) कागल : 13533
8) करवीर : 23902
9) पन्हाळा : 12698
10) राधानगरी : 9772
11) शाहूवाडी : 9092
12) शिरोळ : 19262
13) कोल्हापूर शहर : 27592

असे जिल्ह्यातील सर्व तालुक्यात एकूण 1 लाख 63 हजार 519 विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहेत तर कोल्हापूर शहरातील 27 हजार 592 असे जिल्ह्यात 1 लाख 91 हजार 111 इतके उदिष्ट ठेवण्यात आले आहे.

Last Updated :Mar 17, 2022, 10:32 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details