महाराष्ट्र

maharashtra

पत्नीशी अनैतिक सबंधाच्या संशयातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या; मारेकरी पतीला अटक

By

Published : Nov 15, 2020, 7:34 PM IST

Updated : Nov 15, 2020, 8:51 PM IST

पत्नीशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पतीने तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे.

Young man stoned to death
अनैतिक संबधाच्या संशयातून तरुणाची हत्या

ठाणे - पत्नीशी अनैतिक संबध असल्याच्या संशयातून एका तरुणाची पतीने डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. दीपक मोरे असे आरोपीचे नाव आहे. संजय महादेव गवळी असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे.

माहिती देताना पोलीस अधिकारी
आरोपीच्या घराचा दरवाजा वाजवणे बेतले तरुणाच्या जिवावर -
डोंबिवली पूर्वेकडील ज्योती नगर, आयरे रोड परिसरात आरोपी दीपक मोरे हा पत्नीसह राहतो. तर याच परिसरात मृत संजय गवळी ही राहत होता. काही दिवसापासून आरोपीला आपल्या पत्नीशी मृत संजय याचे अनैतिक संबध असल्याचा संशय होता. त्यातच शनिवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मृत संजयने दीपक मोरेच्या घराचा दरवाजा वाजवला. आरोपी पतीने दरवाजा उघडताच दोघांमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला कि, घराबाहेर पडलेला दगड उचलून आरोपीने संजयच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात संजय गंभीर अवस्थेत निपचिप पडला. त्यानंतर त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

आरोपीला उद्या कल्याण न्यायालयात करणार हजर -
दरम्यान, पोलिसांनी काही तासातच आरोपी दीपक मोरेला ताब्यात घेऊन अटक केली असून त्याला उद्या कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांनी दिली आहे.

Last Updated : Nov 15, 2020, 8:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details