महाराष्ट्र

maharashtra

ATS NIA Raids PFI Offices Aurangabad : एनआयए, एटीएसकडूून औरंगाबादमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी; तिघांना घेतले ताब्यात

By

Published : Sep 22, 2022, 1:20 PM IST

ATS and NIA Raids on Offices of PFI

दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून देशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी सुरू ( ATS and NIA Nationwide Raids on Offices of PFI ) आहे. ज्यात औरंगाबादच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावरसुद्धा एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई केली आहे. ( ATS and NIA Raids on Offices of PFI ) औरंगाबादच्या जिन्सी भागात हे कार्यालय होते. तर या कारवाईत पथकाने एकूण तीन जणांना ताब्यात घेतले आहे.

औरंगाबाद : राष्ट्रीय तपास संस्थेने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयांवर देशभरात छापेमारी सुरू ( ATS and NIA Nationwide Raids on Offices of PFI ) केली आहे. ज्यात औरंगाबादमधे चार ठिकाणी छापा मारून एटीएसने ( ATS and NIA Raids on Offices of PFI ) तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एनआयए, एटीएसकडूून औरंगाबादमध्ये पीएफआयच्या कार्यालयांवर छापेमारी;

एनआयएने घेतले तिघांना ताब्यात :दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून देशातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापेमारी सुरू आहे. ज्यात औरंगाबादच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावरसुद्धा एटीएस आणि एनआयएच्या पथकाने कारवाई केली आहे. औरंगाबादच्या जिन्सी भागात हे कार्यालय होते. तर या कारवाईत पथकाने एकूण तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ज्यात नॅशनल कॉलनीतून सय्यद फ़ैसल, बायजीपुरा भागातून पॉप्युलर फ्रंटचा माजी जिल्हाध्यक्ष शेख़ इरफान आणि परवेज खान याला बायजीपुरा येथून ताब्यात घेतले आहे.

एटीएस आणि एनआयएच्या पथकाने बुधवारी रात्री घेतले ताब्यात :एटीएस आणि एनआयएच्या पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास औरंगाबादच्या जिन्सी भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयावर छापा टाकला होता. कारवाईसाठी आलेल्या पथकाने स्थानिक पोलिसांचीसुद्धा मदत घेतली होती. तसेच सध्या जिन्सी भागातील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यालयाच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.



परभणीतून चौघांना ताब्यात घेतले :औरंगाबादप्रमाणे परभणीतसुद्धा अशीच कारवाई करण्यात आली आहे. औरंगाबाद एटीएस पथकाकडून ही कारवाई करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ज्यात परभणी येथील चौघांना एटीएस पथकाने ताब्यात घेतल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details