महाराष्ट्र

maharashtra

Jaleel Criticized Danve : रावसाहेब दानवे देशाचे मंत्री की जालन्याचे?, अनेक प्रकल्प पळवले; खासदार जलील यांचा आरोप

By

Published : Jan 4, 2022, 2:21 AM IST

Updated : Jan 4, 2022, 2:45 AM IST

रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) देशाचे मंत्री आहेत की जालन्याचे? त्यांनी लोकसभा ऐवजी जालना नगरपालिका निवडणूक लढवावी, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel) यांनी केली आहे. तसेच अनेक प्रकल्प त्यांना जालन्याला पळवल्याचा आरोपही जलील यांनी केला आहे.

MP Imtiaz Jaleel
खासदार इम्तियाज जलील

औरंगाबाद -केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Union Minister Raosaheb Danve) देशाचे मंत्री आहेत की जालन्याचे? त्यांनी लोकसभा ऐवजी जालना नगरपालिका निवडणूक लढवावी, अशी टीका एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (MIM MP Imtiaz Jaleel) यांनी केली आहे.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील
  • पीटलाईनमुळे खासदार जलील संतप्त -

रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्यातून देशातील पहिल्या किसान रेल व नांदेड-हडपसर या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर त्यांनी मनमाड ते परभणी दुहेरीकरण व मराठवाड्यातील इतर रेल्वे प्रकल्पांसंदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी औरंगाबादेत होणारी रेल्वे पीटलाईन आता जालन्यात होणार असल्याचे दानवे यांनी सांगितले. अनेक वर्षापासून औरंगाबादेत रेल्वे पीटलाईन करण्याची मागणी होती, तर केंद्रीय रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या जालना लोकसभा मतदारसंघात प्रकल्प नेला. ते देशाचे केंद्रीय राज्यमंत्री आहेत, फक्त जालन्याचे नाही याचा त्यांना विसर पडला आहे. त्यांनी लोकसभेची निवडणूक न लढवता महापालिका किंवा नगरपालिकेची निवडणूक लढवावी, अशी टीका खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

  • इतर प्रकल्प पळवले -

औरंगाबादेत होणारे क्रीडा विद्यापीठ सत्ताधाऱ्यांनी पुण्याला पळवले. पीटलाईनबाबत औरंगाबादेत करण्यासाठी मागणी केली गेली. औरंगाबाद मराठवाड्याची राजधानी असूनही जालन्यात प्रकल्प नेला. आधीच ड्रायपोर्ट जालन्याला नेले. पीटलाईन तरी किमान चिकलठाणा येथे करायला हवी होती, म्हणजे औरंगाबादेत प्रकल्प राहिला असता आणि त्यांच्या मतदारसंघातही प्रकल्प झाला असता. मात्र, तसे न करता त्यांनी सगळे प्रकल्प लांबवण्याचा झपाटा लावलाय, असा आरोप खासदार इम्तियाज जलील यांनी केला.

Last Updated :Jan 4, 2022, 2:45 AM IST

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details