महाराष्ट्र

maharashtra

औरंगाबादेत जीपला आयशरची धडक; दोन ठार

By

Published : Mar 8, 2021, 8:55 AM IST

लग्न आटोपून पुन्हा गावाच्या दिशेने परतत असताना शिवपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने जीपला धडक दिली.

औरंगाबादेत जीपला आयशरची धडक; दोन ठार
औरंगाबादेत जीपला आयशरची धडक; दोन ठार

औरंगाबाद : गंगापूर तालुक्यातील इसारवाडी-बिडकीन रस्त्यावर जीपला आयशरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात जीपमधील 2 जण ठार झाले, तर 4 जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. शिवपूर फाट्याजवळ ही घटना घडली.

औरंगाबादेत जीपला आयशरची धडक
याविषयी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शेंदुरवादा जवळच्या मांगेगाव येथील गावंडे कुंटुंब क्रुझर जीपमधून पैठण तालुक्यातील आडगाव येथे लग्नाला गेले होते. लग्न आटोपून पुन्हा गावाच्या दिशेने परतत असताना शिवपूर फाट्याजवळ समोरून येणाऱ्या आयशर ट्रकने जीपला धडक दिली. यात क्रुझरमधील गौरव गावंडे आणि आण्णासाहेब गावंडे या दोघांचा मृत्यु झाला. तर जीपमधील 3 पुरूष आणि एक महिलाही या घटनेत जखमी झाली. जखमींवर औरंगाबादेतील शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details